Saturday, January 24, 2026
Homeक्राईमShrirampur : बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल

Shrirampur : बेलापुरातील बेकरीत गोमांस पकडले; श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा दाखल

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील बाजार वेस जवळ असलेल्या उर्दू शाळेच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये आणि बेकरीत गोवंश जातीच्या जनावराचे मांस विकले जात असल्याची माहिती बजरंग दल तसेच गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह सदर ठिकाणी छापा टाकला असता उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शकील आयुब कुरेशी हा जनावराचे मांस विक्री करताना आढळला. तसेच शेजारी असलेल्या बेकरीमध्येही गोमांस सापडले. पोलिसांनी त्याच्या विरोधात पुन्हा दाखल केले आहे.

- Advertisement -

बेलापूर येथील ऋषिकेश बारहाते, अतुल थोरात (उक्कलगाव), संकेत खर्डे (दिनेश राकेचा, कोल्हार), रावसाहेब आमोलिक (वळदगाव), रोहित शिंदे (बेलापूर) हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना बेलापूर येथील उर्दू शाळेच्या पाठीमागे एक इसम गोमांस विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हे सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते सदर ठिकाणी गेले असता शकील आयुब कुरेशी (कुरेशी मोहल्ला, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर) हा इसम जनावरांचे मांस विकत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी बेलापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर आदींनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला.

YouTube video player

उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शकील कुरेशी हा जनावरांचे मांस विकत असल्याचे दिसले. तसेच शेजारी असलेल्या युसुफ अन्वर शेख यांच्या मालकीच्या बेकरीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे मांस आढळून आले. बेलापूर पोलिसांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकार्‍याला पाचरण करून हे मांस गोमांस आहे की नाही याबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी युसुफ अन्वर शेख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आयुब कुरेशी विकत असलेले तसेच युसुफ अन्वर शेख यांच्या बेकरीमध्ये ठेवलेले गोमांस असे एकूण 50 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : शौर्याचा तिरंगा नभात फडकला; ‘भारत माता की जय’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर धरण परिसरातील (Gangapur Dam Area) आकाशात शुक्रवारी (दि. २३) दुपारी भारतीय वायुदलाच्या 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई...