Saturday, June 13, 2026
HomeनगरShrirampur : भोंदू शिंदे बाबाचे अनेक प्रताप समाजापुढे येण्याची शक्यता

Shrirampur : भोंदू शिंदे बाबाचे अनेक प्रताप समाजापुढे येण्याची शक्यता

मंदिर बांधकामाऐवजी केली बंगल्याची पायाभरणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भोंदू बाबा गणेश शिंदे याने आपल्या आश्रमात येणार्‍या भाविकांना मंदिर बांधण्याचे आश्वासन देत, भाविकांकडून लाखो रुपये जमा केले. मात्र, मंदिराचे काम सुरू करण्याऐवजी त्याने प्रथम स्वतःच्या बंगल्याची पायाभरणी केली. याबाबत भाविकांमध्ये कुजबूज झाल्यानंतर, बंगल्याशेजारी मंदिराचे काम सुरू केल्याचे दाखवण्यात आले. तथापि, तेही काम अपूर्ण राहिले असून ‘पैसे संपले’ असे कारण पुढे करून शिंदे याने वेळकाढूपणा केल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

- Advertisement -

बेलापूर येथील भोंदूबाबा गणेश शिंदे याला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर, न्यायालयाने त्याला 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर शिंदे याच्याबाबत विविध धक्कादायक माहिती समोर येत असून, मंदिर उभारणीच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचे उघड झाले आहे. याबरोबरच आश्रमाच्या नावाखाली बाबाचे अनेक उद्योग सुरू असल्याची चर्चाही दबक्या आवाजात तालुक्यामध्ये सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी शहर पोलिसांनी शिंदे याच्याविरुद्ध अत्याचार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका
आपल्या परिसरात कोणी भोंदू बाबा असेल, कुणी आजार बरे करण्याच्या नावाखाली अंगारा धुपारे करत असेल, तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, श्रद्धा ठेवा, परंतू अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. अंधश्रद्धेमुळे आपले शारीरिक, मानसिक व आर्थिक असे तीनही प्रकारचे शोषण हे बुवा, बाबा लोक करत असतात. आपली बुद्धी कुणा बाबा-बुवाच्या हाती गहाण ठेवू नका, असे आवाहन अंनिसचे देविदास देसाई यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...