Saturday, May 4, 2024
Homeनगरगॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ‘त्या’ महिलेचाही मृत्यू

गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ‘त्या’ महिलेचाही मृत्यू

बेलापुर | प्रतिनिधी

गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील ज्योती शशिकांत शेलार यांचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. या आधी

- Advertisement -

बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले होते तर बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून गेला होता.

या वेळी लागलेल्या आगीत शशिकांत शेलार, ज्योती शशिकांत शेलार, यश शशिकांत शेलार व नमश्री शशिकांत शेलार हे चौघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम कामगार हॉस्पिटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते.

तेथे उपचार सुरु असताना मुलगी नमश्री हीचे चार दिवसापूर्वीच निधन झाले होते. तर यश यास दवाखान्यातुन घरी सोडण्यात आले होते. शशिकांत व त्याची पत्नी ज्योती हीच्यावर उपचार सुरु होते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवुन दिली होती.

आज या दुर्घटनेतील सौ. ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचार सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्यावर बेलापुर येथील शेलार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या