Saturday, November 23, 2024
Homeनगरबेलापुरात जुन्या काळातील पंचधातूच्या मूर्तीं सापडल्या

बेलापुरात जुन्या काळातील पंचधातूच्या मूर्तीं सापडल्या

बेलापूर |वार्ताहर| Belapur

तालुक्यातील बेलापूर येथे श्री संभवनाथ जैन मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले आहे. मंदिराच्या जुन्या भींती जेसीबीच्या साह्याने पाडण्याचे काम सुरू असताना पर्युषण पर्वच्या काळात शेवटच्या दिवशी शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी श्री भगवान पार्श्वनाथांच्या 2 मूर्ती भिंतीमध्ये सापडल्या आहेत, अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त अजय डाकले यांनी दिली.
सापडलेल्या पंचधातुच्या श्री पार्श्वनाथ भगवान मूर्तींची साफसफाई केली असता मूर्तींवर 1745 असे कोरल्याचे दिसून येत आहे. बेलापूरचे मंदिर हे ऐतिहासिक जैन मंदिर आहे. मंदिराचे काम सुरू असतांना 19 ऑगस्टला 20 दिवसापूर्वी भगवान पार्श्वनाथांची संगमरवरी मूर्ती सापडलेली आहे.

- Advertisement -

मूर्तीच्या बाजूस दोन श्रीफळ आहेत. मूर्ती पाहण्यासाठी गावातील व परगावातील नागरीकांची गर्दी होत आहे.
श्री संभवनाथ जैन मंदिर हे सुमारे 125 वर्षापूर्वी स्थापन झाले आहे. हे मंदिर जैन समाज तीर्थक्षेत्र म्हणून मानतात. या मंदिरात श्री मनिभद्र स्वामींचे मंदिर आहे. या मंदिरात मूर्तीस अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक बेलापूर येथे दर्शनासाठी येतात. जैनांचे तीर्थक्षेत्र झाले आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अजय डाकले, स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष शांतीलाल हिरण यांनी सापडलेल्या मूर्ती संरक्षीत जागेत ठेवल्या आहेत.

मंदिराचे पुजारी शिवशंकर त्रिपाठी जिर्णोद्धाराचे काम सुरू असताना त्यांना मूर्ती सदृश्य वस्तू दिसल्या. त्यांनी मंदिर विश्वस्तांना माहिती दिली.पंचधातुच्या मूर्तीवर पुजा अर्चा करण्यात येणार असून सापडलेली संगमवररी पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती काचेच्या पेटीत ठेवून मंदिरात दर्शनासाठी जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेवण्यात येणार आहे. 1 वर्षभरात मंदिर उभारणीचे काम पूर्ण होईल, असा मानस असल्याचे डाकले यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या