Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : बेलवंडीच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड

Crime News : बेलवंडीच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड

आठजणांसह 33 लाखांचा रोख रक्कम जप्त

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा पोलीसांच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड टाकत आठजणांना ताब्यात घेत एकूण 32 लाख 58 हजार रुपयाचां मुद्देमाल याम 76 हजार 800 रुपयांची रोख रक्कम, 2 चारचाकी व सहा दुचाकी तसेच पाच मोबाईल जप्त केले आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा पोलीसांच्या पथकाला बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसोरे बुद्रक येथे अवैध जुगार सुरू असल्याची माहिती बातमीदारांमार्फत मिळाली. त्यानूसार पथकाने केलेल्या कारवाईत 8 जुगार्‍यांना जागीच पकडण्यात आले आहे. तर 2 व्यक्ती दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे.

या कारवाईत 76 हजार 800 रुपये रोख, 26 लाख रुपये किंमत दोन चारचाकी आणि सहा दुचाकी आणि 5 लाख 51 हजार रुपयांचे 10 मोबाईल संच, तसेच 70 हजार रुपयांचा एक लॅपटॉप असा 32 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पोलीस पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...