Saturday, April 26, 2025
Homeनगरहंगा नदीच्या पात्रात युवकाचा बुडून मृत्यू

हंगा नदीच्या पात्रात युवकाचा बुडून मृत्यू

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बेलवंडी येथील हंगा नदीच्या (Hanga River) पात्रात सतरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला (Drowning Death) आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली असुन साई संतोष पवार असे या युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, बेलवंडी गावातील हंगा नदीच्या (Hanga River) पात्रात साई पवार हा आपल्या आई व इतर नातेवाईकासमवेत कपडे धुण्यासाठी गेला असता नदीच्या पात्रात असणारी गणपती बाप्पाची मुर्ती काढण्यासाठी तो पात्रात उतरला. पाण्यात जात असतांना साई पवारचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहु लागल्याने काही क्षणातच दिसेनासा झाला. त्याला वाचवण्यासाठी त्यांचा भाऊ व आई व नातेवाईंकांनी आजुबाजुला असणारे तरूण यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही.

साईला शोधण्यासाठी बेलवंडी (Belwandi) गावातील तरुण, नातेवाईक तसेच सरकारी यंत्रणा यांनी नदीत शोधाशोध केली असता सायंकाळी साईचा मृतदेह सापडला. बेलवंडी गावकर्‍यांनी साईच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...