Monday, September 28, 2026
Homeक्राईमShrigonda : बेलवंडीत अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

Shrigonda : बेलवंडीत अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीची कारवाई

35.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसे फाटा येथे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत डंपरसह 35 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दत्तात्रय नामदेव भवाळ (वय 31, रा. ढोकराई, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेण्यात आले असून, संदीप खेडकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. म्हसे, ता. श्रीगोंदा) हा फरार आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय ठोंबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आतार व भगवान थोरात यांच्या पथकाने 4 ऑगस्ट रोजी म्हसे फाटा येथे सापळा रचून डंपर पकडला. तपासणीत डंपरमध्ये वाळू आढळून आली.

चालक भवाळ याच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने ही वाळू संदीप खेडकर याच्या सांगण्यावरून फायबर बोटीतून भरल्याचे सांगितले. कारवाईत 35 लाख रुपये किमतीचा डंपर व 60 हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण 35 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...