मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) यांचे निधन झाले आहे.
कर्करोग आणि नंतर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.
अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. अवघ्या २४ व्या वर्षी अँड्रिलाने या जगाचा निरोप घेतला. याआधी एक नाही तर दोन वेळा एंड्रिलाने कॅन्सरविरोधात यशस्वी झुंज दिली होती.
२०१५ मध्ये अकरावीत शिकत असताना पहिल्यांदा तिला कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर २०२१ मध्ये तिच्या फुफ्फुसात ट्युमर झाला होता.
सर्जरी आणि किमोथेरेपीनंतर तिची तब्येत ठीक झाली होती. मात्र १ नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. गेल्या २० दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती.
शनिवारी रात्री अँड्रिलाची प्रकृती आणखी बिघडली. शनिवारी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.
एंड्रिलाचा जन्म पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथे झाला होता. तिने ‘झुमुर’ मालिकेतून टीव्ही पदार्पण केलं होतं.
‘महापीठ तारपीठ’, ‘जीवन ज्योती’ आणि ‘जीवन काठी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं.
तसेच ‘अमी दीदी नंबर १’ आणि टलव्ह कॅफेट सारख्या चित्रपटांतही ती दिसली होती.