मुंबई | Mumbai
गेल्या सात दिवसांपासून बेस्ट उपक्रमातील (BEST) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संपाबाबत चर्चा केली. या चर्चेत मागण्या मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. बेस्टच्या 19 आगारांमधील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ बनवण्यात आले होते.
आता Tesla वर वैभवराज! एलन मस्कच्या कंपनीच्या खजिन्याची चावी भारतीयाकडे
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सात दिवस चालले. आंदोलनाला विविध आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठिंबा मिळू लागल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. याची झळ सर्वच मुंबईकरांना बसत होती. अखेर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Kirit Somaiya : किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर केला घोटाळ्याचा गंभीर आरोप