Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसव्वा काेटी रुपये देऊनही विश्वासघात; मुलासह इतरांना सरकारी नाेकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मध्यस्थाची...

सव्वा काेटी रुपये देऊनही विश्वासघात; मुलासह इतरांना सरकारी नाेकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मध्यस्थाची आत्महत्या

नाशिक। प्रतिनिधी Nashik

वस्तू व सेवा कर विभागात(जीएसटी) कार्यरत कर्मचाऱ्याने सरकारी नाेकरीचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेतले. मात्र, नाेकरी न मिळाल्याने तणावात असलेल्या मध्यस्थी व्यक्तिने या कर्मचाऱ्याच्या जाचास कंटाळून भाच्याच्या घरी येत आत्महत्या केली.

- Advertisement -

स्वत:च्या मुलासह इतरांच्या मुलांना नाेकरी लागेल, या आशेने सव्वा काेटी रुपये जमवून मध्यस्थाने जीएसटी कर्मचाऱ्यास पाेहाेच केले. असे असतानाही नाेकरीच मिळत नसल्याने मध्यस्थाने हे पाऊल उचलल्याचे समाेर येते आहे. त्यानुसार जीएसटी विभागात कार्यरत संशयित सचिन बबनराव चिखले(रा. नाशिकराेड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पाेलिसांत नाेंदविण्यात आला आहे.

प्रवीण बापू सोनवणे (वय ४९) असे मृत मध्यस्थाचे नाव आहे. साेनवणे हे बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील रहिवासी हाेते. ते निफाड सहकारी साखर कारखान्यात कार्यरत हाेते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...