Friday, May 3, 2024
HomeUncategorizedPodcast : बूस्टर डोसच्या नावाने येणाऱ्या फेक कॉलपासून सावध रहा-सायबर तज्ञ ॲड.चैतन्य...

Podcast : बूस्टर डोसच्या नावाने येणाऱ्या फेक कॉलपासून सावध रहा-सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी

धुळे । प्रतिनिधी dhule

आजकाल केव्हा, कोणाला कशासाठी कॉल येईल काहीही सांगता येत नाही. अत्यंत आस्थेवाईकपणे विचारपया करणारे आणि आपल्या हिताची काळजी वाहणारे त्यांचे वक्तव्य ऐकून हेच आपले खरे हितचिंतक असल्याचे भासतात आणि लोक इथेच खरे फसतात.

- Advertisement -

चलाखीने लुबाडणाऱ्या या महाभागांनी आता कोरोनाचाही फायदा उचलायला सुरुवात केली आहे. आपल्या दोन लस झाल्या असतील तर आता बूस्टर डोस घ्यावाच लागेल, असे सांगून हे भामटे आपली माहिती विचारत आहेत. परंतु अशा कोणत्याही कॉलवर आपली व्यक्तिगत, तसेच इतर माहिती देऊ नका. त्यांना पाठविलेला ओटीपी त्यांना सांगू नका, असे कळकळीचे आवाहन सायबर क्राईम तज्ज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या सावध राहावे, असेही ॲड.भंडारी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या