Wednesday, March 26, 2025
Homeजळगावकस्टडी रुममध्येच प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरपत्रिका

कस्टडी रुममध्येच प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरपत्रिका

कोळगाव येथील प्रकार ; केंद्र संचालकांसह कर्मचार्‍यांचा प्रताप, तिघांविरुध्द गुन्हा

भडगाव  –

तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पूना पाटील महाविद्यालयात बारावीचा इंग्रजीच्या पेपर दरम्यान प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरे लिहिलेली कागद सापडली. तसेच महाविद्यालयातील कर्मचार्‍याच्या मोबाइलमध्येही उत्तरे सापडली. या प्रकरणात केंद्र संचालक, शाळेतील कर्मचारी व शिपाई अशा तिघांवर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. इंग्रजी विषयाच्या पेपरला डॉ.मंजुषा क्षिरसागर यांच्या भरारी पथकाने कोळगाव केंद्रावर सकाळी 11:30 वाजता भेट दिली. यावेळी भरारी पथकास खिडक्यांमधून विद्यार्थांना कॉप्या पुरविताना दिसून आले. तसेच काही लोक एका खोलीतून घाईने बाहेर पडताना दिसले. ती खोली भरारी पथकाने उघडण्यास सांगितली. त्यावेळी कर्मचार्‍यांनी खोली उघडण्यास टाळाटाळ केली. परंतु नंतर खोली उघडली असता ती कस्टडी रुम होती.

- Advertisement -

त्यात परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवले होते. खोलीतील टेबलावर परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत उत्तरे लिहिलेल्या कागदांच्या प्रती दिसून आल्या. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा सुधाकर क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन केंद्र संचालक राजेंद्र संभाजी पाटील , कर्मचारी अरविंद जगन्नाथ सावंत व शिपाई भरत तुकाराम पाटील यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. हे. कॉ. पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उत्तरे व्हायरल?
कस्टडीरुममध्ये मोबाईलची सापडला. त्याची तपासणी केली असता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रश्नपत्रिकेची उत्तरे िलिहलेले फोटो सापडले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपतींच्या समाधीपेक्षा वाघ्या दंतकथेची उंची मोठी का?; संभाजीराजेंचा...

0
मुंबई । Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आल्याचं दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून...