Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा पाणीदार होण्यासाठी ‘भगीरथ प्रयास’

जिल्हा पाणीदार होण्यासाठी ‘भगीरथ प्रयास’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

योग्य स्थळे निश्चित करून भूगर्भात पावसाच्या पाण्याची साठवण झाल्यास गावागावांतील पाणीप्रश्न सुटू शकतो.उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन जिल्हा पाणीदार होण्यास मदत होऊ शकते.या जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 150 गावांत 705 कामे लोकसहभागातून करुन ‘मिशन भगीरथ प्रयास अभियान’ यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.40 गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. येत्या दोन महिन्यांनंंतर जिल्हा परीषदेच्या भगीरथ प्रयत्नांना किती यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत हवा तेवढा निधी मिळू शकतो. गावे समृध्द करता येऊ शकतात. मात्र आजपयर्ंत त्याचा वापर फक्त टंचाईच्या काळात मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यापुरताच केला गेला.यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषदेने ङ्गमिशन भगीरथ प्रयासफ उपक्रमांतंर्गत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शानाखाली गावे टंचाई मुक्त करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे,रोहया ेउपजिल्हाधिकारी नितीन मुंंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक हे सर्व एकत्र आले.शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याचा निर्धार केला आहे.

पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच, मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होऊ लागली असून, गावकर्‍यांचे स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन लाभले तर निश्चितच चित्र बदलु शकेल.या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे. यातील 18 कामांचा प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. उल्लेखनीय काम करणार्‍या गावास दहा लाखाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या कामांची रक्कम जवळपास 100 कोटी रुपये असून पहिल्या टप्प्यात 12 तालुक्यांमधील 150 गावांमध्ये पाच ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत. मे अखेर कामे पूर्ण केली जाणार आहेत. यंदा पावसाळ्यात किती पाणी साठले यावरुन या योजनेचे फलीत स्पष्ट होणार आहे.

गेल्या पंधरा दिवसात 40 गावांमध्ये कामांना सुरवात झाली आहे. सध्या कुशल कामे केली जात आहे. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य खरेदीसाठी ठेकेदारांना जसजसा निधी उपलब्ध होईल तसतशी कामे पुढे केली जाणार आहे. गावातील काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम केले जाणार नाही.एकदा काम झाले की पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज भासू नये असाच आमचा प्रयत्न आहे.

डॉ.अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या