श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी शोभाबाई विधाटे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळला असल्याची माहिती ठेवीदरांचे वकील अजित चोरमल यांनी दिली.
सुमारे 55 कोटी रकमेच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात चेअरमन भारत पुंड, व्हा.चेअरमन आश्विनी पुंड, संचालक बबन पुंड, वैभव विधाटे, शोभाबाई विधाटे व अन्य आरोपींविरोधात ठेवीदारांच्या रक्कमा व व्याज परतफेड न केल्याप्रकरणी फसवणूक, विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी शोभाबाई विधाटे यांनी अहिल्यानगर सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनंगर खंडपिठात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील जामीन न्यायालयाने फेटाळला. ठेवीदारांच्यावतीने अॅड. अजित चोरमल यांनी काम पाहिले.




