Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनबाहुबली : 'भल्लालदेव' गेला हनीमूनला

बाहुबली : ‘भल्लालदेव’ गेला हनीमूनला

मुंबई – Mumbai

अभिनेता राणा दग्गुबती आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज यांचं नुकतंच लग्न झालं. हे दोघं सध्या हनीमूनला गेले आहेत.

- Advertisement -

मिहिकाने आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. कोरोना काळातच मिहिका आणि राणाचं हैदराबादमध्ये धुमधडाक्यात लग्न झालं होतं. तेलुगु आणि मारवाडी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मिहिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघंही हनीमून मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत. ते दोघंही एकमेकांसोबत खूश दिसत आहेत.

राणा दग्गुबती आणि मिहिका यांच्या लग्नामध्ये फक्त 30 वऱ्हाडी सहभागी झाले होते. राणा आणि मिहिकाच्या कुटुंबातले सदस्य आणि जवळचे मित्र यामध्ये होते. व्यंकटेश, सामंथा अक्केनेगी, राम चरण, अल्लू अर्जुन आणि नागा चैतन्य त्यांच्या लग्नाला हजर होते.

मिहिका आणि राणाचं लग्न कोरोना काळात झालं असल्यामुळे संपू्र्ण खबरदारी बाळगून त्यांचं लग्न पार पडलं. लग्नामध्ये सहभागी झालेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. लग्नाचा पूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने उडवली दाणादाण

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातील सावरगाव तळ (Savargav Tal) येथे बुधवारी (दि.2) दुपारी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली. यामध्ये गहू (Wheat), कांदा...