Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही, दोन्ही भावजया…"; भाजप नेत्याचा ठाकरे...

“दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही, दोन्ही भावजया…”; भाजप नेत्याचा ठाकरे बंधुंना टोला

ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्याकरता यांचे मराठीप्रेम जागृत होते अशी टीकाही परिणय फुकेंनी केली

गोंदिया | Gondia
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून ५ तारखेला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. यावर भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरे बंधुंना टोला लगावला आहे. म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी विचारला. तसेच ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्याकरता यांचे मराठीप्रेम जागृत होते अशी टीकाही परिणय फुकेंनी केली.

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला ठाकरे बंधुंनी विरोध केला आहे. येत्या ५ जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. हे सरकारसाठी एक मोठे आव्हान असेल. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून ५ जुलै रोजी मोर्चादेखील काढण्यात येणार आहे. यावर परिणय फुके यांना विचारले असता म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला. तर जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होते, अशी टीका त्यांनी केली. दोन्ही ठाकरे बंधूंची मुले कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करतात असाही टोला यावेळी परिणय फुकेंनी लगावला.

दोन्ही भावजया एकत्र यायला पाहिजे
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा सर्वत्र सुरू असताना यावर परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही, दोन्ही भावजया एकत्र यायला पाहिजे. तर काहीतरी होऊ शकेल असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आता परिणय फुके यांनी केलेल्या टीकेला मनसे आणि ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात २९ जुलै रोजी मुंबईत शासानाच्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; ‘मनोमिलन’ की ‘सीमोल्लंघन’?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा...