Friday, August 14, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने आज-उद्या भरणार

Bhandardara : भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने आज-उद्या भरणार

मुळाच्या पाणलोटात श्रावण सरींची बरसात

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा धरण 98, निळवंडे धरण 99 टक्के भरले असून आज-उद्या हे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
पाणलोटात पाऊस सुरू असून पाण्याची आवक हळूवार सुरू आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 10817 दलघफू (97.99 टक्के) झाला होता. 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 8257 दलघफू (99.08 टक्के) साठा झाला आहे. भंडारदरातून 815 आणि निळवंडेतून 350 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वाकीचा ओव्हरफ्लो 198 क्युसेकने सुरू आहे.

- Advertisement -

मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरल्याने कोतूळ येथून मुळा नदीतील विसर्ग बुधवारी सायंकाळी अवघा 443 क्युसेक होता. पण बुधवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्याने गुरूवारी सकाळी मुळा नदीचा विसर्ग 2829 क्युसेकपर्यंत वाढला होता. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने सायंकाळी हा विसर्ग 3212 क्युसेकपर्यंत वाढला होता. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 22725 दलघफू झाला होता.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतराचा प्रश्न; शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर,...

0
मुंबई | Mumbaiचाकण औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून २० कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. हा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला असताना राष्ट्रवादी...