Saturday, November 14, 2026
HomeनगरRahata : भंडारदरातून पिण्याचे आवर्तन उद्यापासून सोडण्याच्या ना.विखे यांच्या सूचना

Rahata : भंडारदरातून पिण्याचे आवर्तन उद्यापासून सोडण्याच्या ना.विखे यांच्या सूचना

लोणी |वार्ताहर| Loni

टंचाई परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर भंडरदारा धरणातून (Bhandardara Dam) बिगरसिंचनाचे आणि निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सिंचनाचे आवर्तन रविवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या. मागील काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. लोकप्रतिनीधी तसेच ग्रामस्थ शेतकरी यांच्या शिष्टमंशिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई (Water Scarcity) विचारात घेवून आवर्तन सोडण्यची विनंती केली होती.

- Advertisement -

मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची लोणी (Loni) येथे बैठक घेवून भंडारदरा आणि निळवंडे धरणातील उपलब्ध पाण्याचा साठा तसेच भविष्यातील नियोजन याची सविस्तर माहीती जाणून घेतली. सद्यस्थितीत पाण्यची मागणी वाढल्याने आवर्तनाचे नियोजन करावे आशा सूचना त्यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. भंडारदरा धरणातून रविवार दि.15 नोव्हेंबर पासून बिगरसिंचन आवर्तन (Non Irrigation Rotation) सोडण्यात येणार असून,नदीकाठच्या गावांसह श्रीरामपूर (Shrirampur) शहराला या आवर्तनाचा मोठा दिलासा मिळणार आहे. अन्य तालुक्य्यातील पाणी पुरवठा योजनांना याचा लाभ होईल असे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

निळवंडे धरणातून दि.15 नोव्हेंबर पासून सिंचनाचे आवर्तन सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून डावा आणि उजव्या कालव्यांच्या कार्यक्षेत्रातील पिकांना या आवर्तनाचा लाभ होईल गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई काहीप्रमाण दूर होईल. दोन्ही धरणातून सुरू होणार्या आवर्तनाचे नियोजन अधिकार्यांनी अतिशय संवेदनशीलपणे करावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : चंदनापुरी घाटात सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) चंदनापुरी घाटात पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी (दि.१४) सायंकाळी सात ते आठ वाहनांचा...