Wednesday, August 12, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा 65 टक्के भरले

Bhandardara : भंडारदरा 65 टक्के भरले

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून धिम्या गतीने का होईना नवीन पाण्याची धरणात आवक होत असल्याने अखेर काल सोमवारी रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहचला. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 7161 दलघफू (64.87 टक्के) पाणीसाठा झाला होता.

- Advertisement -

रात्री उशीरा यात वाढ होऊन साठा 65 टक्के झाला. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 86 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. निळवंडे धरणातही धिम्या गतीने पाणी येत आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात पाणीसाठा 2968 दलघफू (35.61टक्के) झाला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त; यंदा १५ ऐवजी केवळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik  आगामी सिंहस्थात (Simhastha) कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. साधुग्राम...