Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरा निम्मे भरण्याच्या मार्गावर, मुळा ३५ टक्के

भंडारदरा निम्मे भरण्याच्या मार्गावर, मुळा ३५ टक्के

भंडारदरा, कोतूळ । वार्ताहर

पाणलोटात मान्सून गुरूवारी रात्रीपासून पुन्हा सक्रीय झाल्याने आषाढसरी अधूनमधून जोरदार बरसत आहेत. परिणामी ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल रात्री ४६ टक्के झाला होता. पाऊस टिकून राहिल्यास आज अथवा उद्या हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गत पाचसहा दिवसांपासून पाणलोटात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणाकडे येणारा पाण्याचा ओघ मंदावला होता. पण गुरूवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहिसे वाढल्याने काल सायंकाळी संपलेल्या २४ तासांत धरणात ३०९ दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

हे देखील वाचा : पवारांचे अकोलेत भांगरेंना बळ; आ. लहामटे यांची डोकेदुखी वाढली

त्यामुळे सायंकाळी धरणातील पाणीसाठा ५०५१ दलघफू (४५.७६टक्के) झाला होता. रात्री हा साठा ४६ टक्क्यांवर पोहचला आहे. वाकीचा ओव्हरफ्लो सुरू असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा हळुवार वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा १६०८ दलघफू (१९.३१ टक्के) झाला होता.

मुळा पाणलोटातही पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे. गुरूवारी मुळा नदीचा विसर्ग ८८६ क्युसेकवर आला होता. पण रात्रीपासून पाऊस सुरू झाल्याने काल शुक्रवारी कोतूळ येथे सकाळी मुळा धरणाकडे कोतूळ येथून १६३३क्युसेस तर सायंकाळी १३९३ क्युसेस पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणात काल अखेर नव्याने ३०४० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली असून मुळा धरणाचा साठा ९००६ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) झाला आहे.

हे देखील वाचा : परीक्षा नगर झेडपीची अन् लेखी पेपर नागपूर, वर्धा, मुंबईत

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या