Sunday, May 26, 2024
Homeनगरभंडारदरा 70 टक्के भरले

भंडारदरा 70 टक्के भरले

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने गत 12 तासांत 105 दुलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यापैकी 35 दलघफू पाण्याचा वापर झाला. 70 दलघफू साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7653 दलघफू (69.33टक्के) झाला होता. रात्री उशीरा पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचला होता.

- Advertisement -

चार-पाच दिवसांपासून पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने अधूनमधून सरी कोसळत आहेत. मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे वाढले. डोंगररांगा धुक्याने झाकाळून गेल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे घाटघर व रतनवाडीत धुण्या पेटल्या आहेत. काल दिवसभर भंडारदरात 23 मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणात 91 दलघफू पाणी आले. पाणीसाठा 2668 (32 टक्के) दलघफू झाला होता.

गत 24 तासांत झालेला पाऊस मिमी- भंडारदरा 35, घाटघर 40, रतनवाडी 59, वाकी 23.

मुळा पाणलोटातही संततधार सुरू असल्याने धरणाकडे नवीन पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 266 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने काल सकाळी धरणातील पाणीसाठा11002 दलघफू (42.31)झाला होता. तर कोतूळ येथे 7 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी येथील मुळेचा विसर्ग 2984 क्युसेकने सुरू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या