Sunday, September 29, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा, मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

दारणा 40, भावली 52.65 तर गंगापूर 33.32 टक्क्यांवर || कुकडी समूह धरणांमध्ये 750 दलघफू पाणी आवक

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला होता. पण काल अचानक जोर ओसरल्याने धरणांमध्ये येणारी पाण्याची आवकही कमी अधिक होत आहे. रविवारी रात्री आषाढ सरींनी तांडव केल्याने सकाळी संपलेल्या बारा तासांत 318 दलघफू पाणी भंडारदरात आले. त्यानंतर पाऊस ओसरल्याने काल दिवसभरात केवळ 71 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4564 दलघफू (41.54 टक्के) झाला होता.

- Advertisement -

गत 24 तासांत पडलेला पाऊस असा मिमीध्ये भंडारदरा 24, घाटघर 40, पांजरे 33, रतनवाडी 35. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात कोतूळ व हरिश्चंद्रगड परिसरात आषाढ सरींची रिपरीप सुरू आहे. यामुळे मुळा नदीचा विसर्ग टिकून होता. सकाळ 2829 क्युसेस होता तर सायंकाळी विसर्ग 1873 कयुसेस झाला होता. मुळा धरणाचा साठा 8205 दलघफू झाला असून धरणात एकूण 2 टीएमसीपेक्षा अधिक नवीन पाण्याची आवक झाली आहे.

दारणा 40, भावली 52.65 तर गंगापूर 33.32 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर इगतपुरी, घोटी परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस झाला. काल मात्र घाटमाथ्यावर पाऊस मंदावला होता. नाशिक परिसरातही कडक ऊन पडले होते. असे असले तरी भावली, दारणात नविन पाणी वाहून येत आहे. भावली धरण 52 टक्क्यांवर तर दारणा धरण 40 टक्क्यांवर पोहचले आहे. काल दिवसभर घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र शनिवार व रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांमध्ये पावसाचे आगमन होत आहे. डोंगरमाथ्यावरील धबधबे, तसेच छोटे मोठे ओढे, नद्या, नाले धरणांच्या दिशेने वाहत येत आहेत. दारणा पाणलोटातील दारणाला 23 मिमी, घोटी 48 मिमी, इगतपुरीला 45 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 वाजेपर्यंत दारणात मागील 24 तासांत 204 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे दारणाचा साठा 40.13 टक्क्यांवर पोहचला आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 2869 दलघफू पाणीसाठा आहे.

भावली प्रकल्प 52.65 टक्के इतका झाला आहे.1434 क्षमतेच्या या धरणात 755 दलघफू पाणीसाठा तयार झाला आहे. काल सकाळपर्यंत 24 तासांत भावलीत 56 दलघफू नविन पाणी दाखल झाले. काल सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांत भावलीच्या भिंतीजवळ 42 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून भावलीला 1119 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुकणे धरण 14.02 टक्के, वाकी 7.95 टक्के, भाम 43.43 टक्के असा साठा आहे. काल सकाळ पर्यंत मुकणे 44 मिमी, वाकी 55 मिमी, भाम 27 मिमी, वालदेवी 17 मिमी असा पाउस झाला.

काल गंगापूर च्या पाणलोटातही पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत गंगापूरला 39 मिमी, कश्यपी 25 मिमी, गौतमी गोदावरी 46 मिमी, कडवा 13 मिमी, आळंदी 11 मिमी, अंबोली 75 मिमी, त्र्यंबक 76 मिमी, असा पाउस नोंदला गेला. गंगापूर मध्ये काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात 149 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 1876 दलघफू नविन साठा आहे. हे धरण 33.32 टक्के भरले आहे. काश्यपी 11.50 टक्के, गौतमी गोदावरी 25.64 टक्के, कडवा 36.08 टक्के, आळंदी 2.82 टक्के असा पाणीसाठा आहे. नांदूरमधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 20 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. कालच्या तारखेला तो मागील वर्षी 34.38 टक्के इतका झाला आहे.

कुकडी समूह धरणांमध्ये 750 दलघफू पाणी आवक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प धरणांच्या पाणलोटात गत दोन दिवसांपासून पावसाने काहीसा जोर पकडल्याने धरणांमध्ये आवक होत आहे. गत 24 तासांत धरणात 750 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्याळे धरणांतील पाणीसाठा 4417 दलघफू (14.88टक्के) झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाणीसाठा आहे. गतवेळी 3497 दलघफू पाणी होते.

1120 दलघफू क्षमतेच्या येडगाव धरणातील पाणीसाठा 620 दलघफू (31.90 टक्के) झाला. 1698 दलघफू क्षमतेच्या माणिकडोह धरणात 998 दलघफू (9.81टक्के) पाणीसाठा आहे. वडजमध्ये 23 टक्के पाणणी आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये आहे. सर्वाधिक क्षमतेच्या डिंभे धरणात 2522 दलघफू (20.19 टक्के) पाणीसाठा आहे. घोड धरणातही पाण्याची आवक होत आहे. या धरणातील पाणीसाठा 6 टक्के आहे.

दरम्यान, गत दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणीसाठ्यावरच शेतकरी पिकांचे नियोजन करीत असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या