Wednesday, June 26, 2024
Homeनगरभंडारदरा पुन्हा तुडूंब; आवक कायम

भंडारदरा पुन्हा तुडूंब; आवक कायम

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असला तरी गत 36 तासांत धरणात नव्याने 451 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा 10974 दलघफू (99.4 टक्के) झाला आहे. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 11000 दलघफूच्या पुढे सरकला होता. दरम्यान, आढळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले झाले आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यास भंडारदरा धरणातून ओव्हरफलो सुरू होण्याची शक्यता आहे. धरण तुडूंब झाल्यानंतर गत दहा पंधरा दिवसांपासून या भागात मान्सून गायब झाला होता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तशीच पिके जळू लागली होती. अशातच बुधवारी रात्रीपासून तुरळक पावसास सुरूवात झाली. त्यानंतर गुरूवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे काल दिवसभरात धरणात नव्याने 50 दलघफू पाणी आले होते.

शुक्रवारी पावसाचा आणखी जोर वाढल्याने धरणात 300 दलघफू पाणी दाखल झाले. शनिवारी सायंकाळी संपलेल्या 36 तासांत धरणात नव्याने 451 दलघफू पाणी दाखल झाले. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 15 मिमी झाली आहे. निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 6862 दलघफू असून विसर्ग 1717 क्युसेकने प्रवरा नदीत सुरू आहे. वाकी तलावातून 197 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे.

गत 24 तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा 67, घाटघर 128, पांजरे 79, रतनवाडी 97, वाकी 43.

मुळा पाणलोटातील पाऊस ओसरला

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा पाणलोटात शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता. पण काल पावसाचा जोर ओसरल्याने धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. शुक्रवारी हरिश्चंद्र गड, आंबित व अन्य भागात पाऊस वाढल्याने कोतूळ येथील विसर्ग वाढला होता.

तो शुक्रवारी सायंकाळी 2247 क्युसेकपर्यंत वाढला होता. पण शनिवारी पाऊस ओसरल्याने मुळेचा कोतूळ येथील विसर्ग केवळ 1550 क्युसेक झाला होता. मुळा धरणातून 1550 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा 21022 दलघफू (80.85टक्के) झाला होता.

कुकडीचा पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कुकडी धरण समूह पाणलोटात शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत तब्बल 2583 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 23798 दलघफू (80.19 टक्के)झाला होता. या समूहातील सर्वाधिक मोठ्या म्हणजे 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 13318 दलघफू (98.18) टक्के झाला आहे. या धरणातून 3720 क्युसेकने सुरू होता.

काल दिवसभरात कुकडी समूह धरणात 544 दलघफू पाणी दाखल झाले होते. वडज धरण (1272 दलघफू)100 टक्के भरले असून काल दुपारपासून या धरणातून विसर्ग वाढवून सायंकाळी तो 3112क्युसेक करण्यात आला आहे. तसेच मीना पूरक कालवाही वाढवून 180 क्युसेक करण्यात आला आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा 75.77 टक्के झाला आहे. माणिकडोह 67.79 टक्के भरले आहे. येडगाव धरण भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी साठा आहे. या काळात धरणात गतवर्षी 90 टक्के पाणीसाठा होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या