Saturday, March 29, 2025
Homeनगरभंडारदरात 22 दलघफू पाण्याची आवक

भंडारदरात 22 दलघफू पाण्याची आवक

भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात शनिवारी रात्री पाऊस झाल्याने धरणात नव्याने 22 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात 1167 दलघफू पाणीसाठा झाला होता. आतापर्यंत धरणात 122 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे.

- Advertisement -

तीन चार दिवस पाऊस गायब झाल्यानंतर मान्सून शनिवारी सक्रिय झाला होता. शनिवारी भंडारदरात 17 मिमी पावसाची नोंद झाली. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 22 दलघफू पाणी आले. वाकी तलावातही पाणी साठा वाढत आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 49.85 दलघफू पाणीसाठा होता. काल रविवारी पाणलोटात ढगाळ वातावरण होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमध्ये आयोजित विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...