Thursday, June 18, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस 218 दलघफू पाण्याची आवक

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस 218 दलघफू पाण्याची आवक

घाटघरला 122 तर रतनवाडीत 107 मिमी नोंद

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याच्या विकासात मोठा हातभार असणार्‍या भंडारदरा धरण पाणलोटात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने काल मंगळवारी सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 218 दलघफू पाणी दाखल झाले. पाणलोटातील चेरापुंजी असलेल्या घाटघर 5 तर रतनवाडीत 4 इंच पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

गत दोन दिवसांपासून पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. डोंगरदर्‍या आणि रस्ते धुक्याने लेपाटून गेले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गारठा निर्माण झाल्याने धुण्याही पेटल्या आहेत. अशातच सोमवारी रात्री पावसाने जोर धरला. त्यामुळे डोंगरदर्‍यांमधील धबधबे जोमाने वाहु लागले. ओढेनालेही जोरदार वाहु लागले. परिणामी भंडारदराचे खपाटीला गेलेले पोट हळूहळू वाढु लागले आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 218 दलघफू पाण्याची आवक झाली.

11039 क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 2370 दलघफूवर पोहचला होता. काल मंगळवारी पावसाचा जोर कमी होता. निळवंडेतही आवक सुरू असून 2586 दलघफू पाणी होते. वाकी तलाव आणि दरम्यान, कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटात पावसाचा फारसा जोर होत नसलातरी अधून मधून पडणार्‍या सरींमुळे पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक होत आहे.

24 तासांतील पाऊस (मिमी मध्ये)
भंडारदरा 60, घाटघर 122, पांजरे 78, रतनवाडी 107

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...