Sunday, May 17, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर मंदावला

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर मंदावला

भंडारदरा 46 टक्के तर निळवंडेचा पाणीसाठा 40 टक्क्यांच्या पुढे सरकला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5068 दलघफू (45.91 टक्के) तर निळवंडेचा 3391 दलघफू (40.72 टक्के) झाला आहे. यंदा मान्सूनचे लवकरच आगमन झाले आहे. तेव्हापासून पाऊस सुरू असल्याने अजूनही खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मात्र, जलाशयांमध्ये नवीन पाण्याची आवक होत असल्याने आणि निसर्ग सौंदर्य खुलल्याने आनंदाला उधाण आलेले आहे.

- Advertisement -

यामुळे पर्यटक देखील पावसात भिजून निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत (मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा 30, घाटघर 77, पांजरे 51, रतनवाडी 69, वाकी 28, निळवंडे 22, आढळा 3 तर अकोले येथे 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1060 दलघफु क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी 828 दलघफु (78.11 टक्के) झाला आहे.

मुळा नदीचा प्रवाह टिकून

राहुरी/कोतूळ |वार्ताहर| Rahuri

अकोले तालुक्यातील मुळा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी अधूनमधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे. यामुळे मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. गेल्या आठ दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाल्यानंतर मुळा नदी वाहू लागली आहे. पाणलोटक्षेत्रातील आंबित, शिरपुंजे, पिंपळगाव खांड येथील धरणे भरून मुळा धरणाकडे आवक सुरू आहे.

धरणात आजअखेर 2162 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. मंगळवारी सकाळी कोतूळ येथून 3822 क्यूसेस तर संध्याकाळी 5016 क्यूसेसची आवक मुळा धरणाकडे सुरु होती. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 11, 068 दशलक्ष घनफुट झाला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे आगमन

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात तुरळक प्रमाणात काजव्यांचे आगमन झाले आहे. हे प्रमाण हळूहळू वाढत जात आगामी काही दिवसांत काजव्यांची मायावी दुनिया येथे अवतरणार असून...