Saturday, August 1, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा पाणलोटात पुन्हा पाऊस; निळवंडेतून 10209 क्युसेकने विसर्ग

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात पुन्हा पाऊस; निळवंडेतून 10209 क्युसेकने विसर्ग

जायकवाडी 71.25 टक्क्यांवर || दारणा, गंगापूर च्या पाणलोटात मध्यम पाऊस

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने या धरणातून 10209 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून ते पाणी जायकवाडीच्या दिशेने निघाले आहे. गत तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी झाली होती. परिणामी विसर्गही कमी करण्यात आला होता. पण काल सकाळपासून पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाण्याचे लोंढे धरणांत विसावत होते.

- Advertisement -

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदराचा साठा 10402 दलघफू कायम ठेऊन सकाळी 5295 क्युसकेने पाणी सोडण्यात आले. तर निळवंडेतून प्रवरा नदीत 5295 क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी भंडारदरातून 4867 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. वाकीतून 556 क्युसेकने विसर्ग सुरू होता. निळवंडेतून विसर्ग वाढविण्यात येऊन तो 10209 क्युसेक करण्यात आला. आढळातही आवक सुरू झाली असून हे धरण तुडूंब झाल्याने 198 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Rahata : दारणा, गंगापूरच्या पाणलोटात मध्यम पाऊस; जायकवाडी 71.25 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात काल मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचे आगमन होत होते. वरील धरणातील विसर्ग घटविण्यात आल्याने नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग 3155 क्युसेक वर आणण्यात आला आहे. खाली जायकवाडीत उपयुक्त साठा 71.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.

काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 3, भामला 17, भावलीला 23 मिमी, तसेच इगतपुरी, घोटी येथे मध्यम पाऊस झाला. गंगापूर समूहातील कश्यपिला 14 गंगापूर 3, त्र्यंबक 4, आंबोली 29, गौतमी 5 मिमी असा पाऊस नोंदला गेला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विसर्ग ही कमी झाल्याने दारणा धरणातून काल सायंकाळी 6 वाजता 5408 क्युसेक, कडवा क्युसेक, भावली 481 क्युसेक, वालदेवी 599 क्युसेक, भाम 1057 क्युसेक, आळंदी 446 क्युसेक, कडवा 2319 क्युसेक ने सोडण्यात येत आहे.

गंगापूर मधून 1296 क्युसेक, कश्यपी 500 क्युसेक असे विसर्ग सुरू आहेत. पालखेड मधून 1520 क्युसेक, करंजवन 1272 क्युसेक, भोजापूर 199 क्युसेक, वाघाड 804 क्युसेक, तिसगाव 100 क्युसेक ने विसर्ग सुरू आहे. नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 3155 क्युसेकने सोडण्यात येत आहे. काल सकाळी 6 वाजेपर्यंत 33.8 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

खाली जायकवाडीच्या जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त पाणी साठा 71.25 टक्के इतका झाला होता. उपयुक्त पाणी साठा 54.62 टक्के, तर मृतसह एकूण साठा 80.62 टीएमसी इतका आहे. काल सायंकाळी 6 वाजता मागील 9 तासात 57463 क्युसेक सरासरी आवक झाली. नगर, नाशिक ची समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची चिंता मिटली आहे. उपयुक्त पाणी साठा 65 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. तो काल 71.25 टीएमसी च्या पुढे सरकला आहे.

कुकडीत 75 टक्के पाणीसाठा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाणलोटात अजूनही पाऊस सुरू असल्याने कुकडी समूह धरणांमधील पाणीसाठा हळूहळू वाढत असून तो 75 टक्क्यांवर पोहचला आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांमध्ये 1208 दलघफू पाणी दाखल झाल्याने उपयुक्त पाणीसाठा 21742 दलघफू (73.26 टक्के) झाला होता. गत वर्षी केवळ 19735 दलघफू (65 टक्के) पाणीसाठा होता.

यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पातील डिंभे, घोड, विसापूर, येडगाव, वडज धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पिंपळगाव जोगे धरणाचा साठाही 51 टक्क्यांवर गेला आहे. डिंभे आणि वडज धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

कॉमनवेल्थ गेम्स 2026 : ‘ज्यूदो’त भारताची सुवर्ण झेप; अस्मिता डे आणि...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या ज्यूदोपटूंनी इतिहास रचत देशाच्या पदकसंख्येत आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता...