Tuesday, March 25, 2025
Homeनगरभंडारदरा पाणलोटात पाऊस

भंडारदरा पाणलोटात पाऊस

मुळा पाणलोटातही रिमझीम

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर Bhandardara

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रविवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत ढगांच्या गडगडाटात, विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. भंडारदरात पडलेल्या या पावसाची नोंद 10 मिमी झाली आहे. दरम्यान, कोतूळ येथे शनिवारी काही काळ जोरदार पाऊस झाला होता. रविवारी दिवसभर रिमझीम सुरू होती.

- Advertisement -

आठ-दहा दिवसांपूर्वी पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेतही जोरदार आवक झाल्याने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले. या हंगामात प्रवरेला प्रथमच पूर आला होता. पण त्यानंतर पावसाने या भागातून काढता पाय घेतला. नदीतील विसर्गही अंत्यत कमी झाला. काल अचानक दुपार जोरदार पाऊस झाला. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10667 दलघफू (96.63टक्के) होता. निळवंडेत 7446 दलघफू (89.41टक्के) साठा असून नदीत 1443 तर कालव्यातून 330 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित,पाचनई, कोतूळ येथे शनिवारी पाऊस झाला. रविवारीही रिमझीम सुरू होती. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत रविवारी मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग काहीसा वाढला होता. 795 क्युसेकने नदी वाहती होती. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 23022 दलघफू (88.54 टक्के) होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...