Wednesday, August 19, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

मुळा 90 टक्के भरले

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणात पाण्याची हळूवार आवक होत असून 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 23371 दलघफू साठा झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर गेला होता. कोतूळ येथील मुळा नदीचा विसगर 4429 क्युसेक होता.

- Advertisement -

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 11000 दलघफू होता. पाऊस सुरूच असल्याने धरणातून 4279 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतील पाणीसाठा 8282 दलघफू (99.38 टक्के) आहे. या धरणातून प्रवरा नदीत 4065 क्युसेकने सुरू होता.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...