Saturday, May 4, 2024
Homeनगरभंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याची (Ahmednagar District) जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) पाणलोटात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने भंडारदरा धरण काल दुपारी 1 वाजता 80 टक्के भरले. जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या अंब्रेला फॉलद्वारे (Umbrella Fall) 413 क्युसेकने पाणी प्रवरा नदी (Pravara River) पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता निळवंडे (Nilwande), भंडारदरा ने (Bhandardara) पाणी सोडण्यात येत आहे.

- Advertisement -

भंडारदरा व वाकी (Waki) परिसरात पाऊस सुरू असल्याने वाकी तलावातून 1574 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अन्य ठिकाणचे पाणीही जमा होत असल्याने 8320 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण (Nilwande Dam) 40 टक्कयांवर गेला आहे. या धरणातील पाणीसाठा (Water Storage) काल सकाळी 3215 दलघफू झाला होता.परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर झालेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. काल सकाळी नोंदला गेलेला पाऊस असा-भंडारदरा 163, घाटघर (Ghatghar)180, रतनवाडी (Ratanwadi) 170, वाकी (Waki) 159 मिमी.

भंडारदरा धरण पाणीसाठ्यात (Bhandardara Dam Water Storage) वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 29 जुलै 2021 रोजी भंडारदरा धरणाच्या 200 व्हॅाल्व मधून (अंब्रेला फॅाल) द्वारे 413 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा पर्यटकांनी धिंगाणा घालु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ओव्हरफ्लो कालावधीमध्ये सदर विसर्ग सुरू राहिल, असे अहमदनगर पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या