Monday, May 12, 2025
HomeनगरRain News : भंडारदरात पुन्हा अवकाळी पावसाची वादळी बॅटिंग

Rain News : भंडारदरात पुन्हा अवकाळी पावसाची वादळी बॅटिंग

धरणात 25 दलघफू पाणी नव्याने दाखल

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

गत तीन दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरात अवकाळी पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू असून त्याने काल रविवारी सायंकाळीही जोरदार बॅटिंग केली. दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 25 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

- Advertisement -

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने या भागात जोरदार सलामी दिली. शनिवारीही अधूनमधून पाऊस कोसळला. रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने जोर वाढविला. सायंकाळी सव्वा सहा ते पावणे सातच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी शेतांमध्ये पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे आंबा व अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे.

या अवकाळी पावसामुळे भंडारदरात 25 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 4097 दलघफू (37.77 टक्के) पाणीसाठा होता. धरणातून आवर्तनासाठी 2689 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडे धरणात सध्या 1758 दलघफू (21.11 टक्के) पाणीसाठा आहे. या धरणातून कालव्यांमधून आवर्तन सुरू आहे. दरम्यान, आढळा धरणातील पाणीसाठाही समाधानकारक आहे. या धरणात सध्या 500 दलघफू (47.17 टक्के) पाणीसाठा आहे. वाकी तलावात 52.90 दलघफू (46.95 टक्के) पाणीसाठा आहे. यंदा धरणात समाधानकारक पाणी असून मान्सूनच्या लवकर आगमनाची शक्यता आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Newasa : दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा तालुक्यातील गेवराई येथे शनिवार दि. 10 रोजी दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली....