Monday, June 24, 2024
Homeनगरभंडारदरातून 2647 क्युसेकने विसर्ग

भंडारदरातून 2647 क्युसेकने विसर्ग

भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल मंगळवारीही पाऊस सुरू होता. त्यामुळे गत 36 तासांत पावसाने तुडूंब असलेल्या भंडारदरा धरणात 367 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. हे सर्व पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. ते निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळी 7317 दलघफू झाला होता.

घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस झाल्याने विसर्ग काल मंगळवारी सकाळी 3256 क्युसेकने सुरू होता तर सायंकाळी 6 वाजता या धरणातून 2447 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग तसेच कृष्णवंतीचे पाणी जमा होत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 7566 दलघफू झाला होता. दरम्यान, कोतूळ वार्ताहराने कळविले की, पाणलोटात पाऊस कमी झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या