श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अनेक दिवसांपासूनच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला काल अखेर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी समर्थकांसह आपले नातू नीरज मुरकुटे यांना घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत पूर्णविराम दिला. तत्पूर्वी श्रीरामपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतले.
ठाणे येथील आनंद आश्रम येथे हे दोन्ही पक्षप्रवेश झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा संकल्प करत माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी आपल्या 650 समर्थकांसह ठाणे येथील आनंद आश्रम येथे जाऊन धनुष्यबाण हाती घेतले. यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर आदी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली चळवळ आहे. मुरकुटे समर्थकांचा प्रवेश म्हणजे पक्षाच्या विचारधारेत रुजलेल्या निष्ठावान नेतृत्वाची भर आहे. यामुळे पक्षाचे बळ श्रीरामपूर तालुक्यात अधिक घट्ट होईल.
छल्लारे समर्थक
संजय छल्लारे व समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळ्यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर, शिवसेना सचिव संजय मोरे, विधानसभा निरीक्षक गालपगारे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, सुनिल कराळे, बापूसाहेब शेरकर, उमेश पवार, प्रविण फरगडे, सदाशिवराव उंडे, महादेव ओवाळ, तालुकाप्रमुख संतोष डहाळे, उपतालुकाप्रमुख शिवनाथ फोपसे, युवासेना तालुकाप्रमुख शुभम ताके, ओबीसी सेल तालुकाप्रमुख भाऊसाहेब, संघटक नितीन मासाळ, ओबीसी सेल तालुका संघटक संभाजी देवकर, डॉ. फरगडे, धीरज हेलकुटे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुबैय्या, तेजस बोरावके, रोहित नाईक, दत्तात्रय करडे, संजय साळवे, योगेश धसाळ, संजय परदेशी, राजेंद्र बोरसे, महेंद्र टाटीया, अकिल पठाण, सुहास परदेशी, विशाल पापडिवाल, ज्ञानेश्वर सारंगधर, फिरोज शेख, देवेन पिडीयार, बापू कदम, शाम हेलकुटे, मोती व्यवहारे, रवींद्र भांबरे, आनंद यमे, प्रमोद गायकवाड, राजेंद्र भांबरे, चंद्रकांत कर्नावट, राजू डुकरे, आकाश परदेशी, विकी गंगवाल, ज्ञानेश्वर सोज्वळ, राजू ठाकूर, राजू परदेशी, बाळासाहेब सोमासे, प्रकाश परदेशी, आदित्य देसाई, निलेश पांडे, प्रशांत ताजने, निलेश कारवाल, निलेश मटाले, अशोक शिरसाठ, वैभव रासने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय छल्लारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीरामपूर येथे येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचा मेळावा श्रीरामपूर येथे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
खंबीरपणे शिवसेनेसोबत
माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा आहे. शिवसेना हा फक्त पक्ष नसून जनतेशी नाळ जोडलेली एक चळवळ आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत खंबीरपणे ऊभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
डोळ्यासमोर शहर विकास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून श्रीरामपूर शहराचा विकास करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश केला असल्याचे संजय छल्लारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी छल्लारे यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीरामपूर येथे येण्याचे आमंत्रण दिले.