Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्यागान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे उद्या रामकुंडात विसर्जन

गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे उद्या रामकुंडात विसर्जन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गान कोकिळा दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अस्थींचे विसर्जन उद्या (दि १०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत रामकुंडात (Ramkund Godavari river nashik) करण्यात येणार आहे. यावेळी आशा भोसले (Asha bhosale) यांच्यासह कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

सुमारे आठ दशके आपल्या आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर (वय 92) यांचे रविवारी निधन झाले. त्याच दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dadar Mumbai) शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या भावाने आणि भाच्याने त्यांना मुखाग्नि दिला होता.

यानंतर भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या अस्थींचा अस्थिकलश भाऊ आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर (Rudaynath Mangeshkar) यांचा मुलगा आदिनाथ (Adinath) यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनी माध्यमांना दिली होती.

त्यांच्या अस्थींचे विसर्जन कुठे केले जाणार याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, आज मंगेशकर कुटुंबीय नाशिकमध्ये अस्थीविसर्जन करण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लता दीदींच्या चाहत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

उद्या सकाळी आठच्या सुमारास रामकुंडात अस्थींचे विसर्जन होईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी आशा भोसले, उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), हृदयनाथ मंगेशकर (Rudaynath Mangeshkar), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे समजते.

दरम्यान, पोलिसांना अद्याप बंदोबस्तासाठीचे कुठलेही आदेश धाडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप रामकुंडावर अस्थीविसर्जनासाठीचा कुठल्याही बंदोबस्ताची तयारी करण्यात आलेली दिसून आली नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या