Tuesday, November 26, 2024
Homeमनोरंजनएसपी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्यावा

एसपी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावा

दिल्ली | Delhi

प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचे शुक्रवारी (29 सप्टेंबर) रोजी निधन झाले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (CM jaganmohan reddy) यांनी गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन (Bharat Ratna award), त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रद्वारे केली आहे.

- Advertisement -

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, “आंध्र प्रदेशच्या नेल्लूरमध्ये या प्रतिभावान गायकचा जन्म झाला. तब्बल पाच दशकांचे त्यांचे करिअर संगीत विश्वाचा अविभाज्य आहे. मरणोत्तर ‘भारतरत्न’ ही त्यांच्या योगदानप्रति खरी श्रद्धांजली असेल.

त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकृती अलौकिकतेच्या पलीकडच्या आहेत. आपल्या अद्वितीय प्रतिभेने एसपी बालासुब्रमण्यम यांनी त्यांच्या कलाकृतींना उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने भारतातील चाहत्यांनाच नव्हे, तर जगभरातील मोठ्या कलाकारांना दुःख झाले आहे. त्यांच्या जाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्राचीही हानी झाली आहे.

लता मंगेशकर, भूपेन हजारिका, एमएस सुब्बलक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल महान गायक एसपी बालासुब्रमण्यम यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी विनंती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या