Saturday, May 4, 2024
HomeजळगावPhoto जळगाव शहरातील विविध भागात महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन

Photo जळगाव शहरातील विविध भागात महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन

जळगाव jalgaon

युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौक या ठिकाणी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

तसेच काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले व शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे, तर ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे व युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी त्या-त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘भारतमाता की जय’चा जल्लोष करण्यात आल्याने परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या