Thursday, May 15, 2025
Homeदेश विदेशBhargavastra : भारताची स्वदेशी ‘भार्गवस्त्र’ हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्रणालीची यशस्वी...

Bhargavastra : भारताची स्वदेशी ‘भार्गवस्त्र’ हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी; एकाच वेळी अनेक ड्रोन पाडण्याची क्षमता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील निर्माण झालेला तणाव सध्या काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या तणावादरम्यान भारताने पाकिस्तानकडून होणारे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. भारत-पाकिस्तान देशांदरम्यान तणाव कमी झाल्यानंतर आता भारत आपली क्षेपणास्त्राची ताकद वाढवण्यावर भर देत आहे. आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात ‘भार्गवास्त्र’ची भर पडली आहे.

- Advertisement -

हवाई हल्ल्यांदरम्यान ड्रोन पासून होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एका नवीन अस्त्राची भर पडली आहे. ‘भार्गवास्त्र’ नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली ‘सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल’ने डिझाईन आणि विकसित केली आहे. त्याची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली आहे. ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. ‘भार्गवास्त्र’ ही प्रणाली सूक्ष्म रॉकेटद्वारे ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. विशेषतः ड्रोनच्या धोक्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली विकसित केली गेली आहे.

‘भार्गवास्त्र’ हे २.५ किमी अंतरावर लहान आणि येणाऱ्या ड्रोनला शोधून नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यावेळी आर्मी एअर डिफेन्सचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

तसेच यावेळी दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट सोडण्यात आले. एक चाचणी दोन सेकंदात सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट सोडण्यात आली. चारही रॉकेट्सनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. दरम्यान, समुद्र सपाटीपासून ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाइन केलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्वाची ठरणारी आहे.

भार्गवस्त्राची वैशिष्टै
पहिल्या थरात: Unguided Micro Rockets, जे 20 मीटर व्यासातील ड्रोन झुंडी नष्ट करू शकतात.
दुसऱ्या थरात: Guided Micro Missiles, जे टप्प्याटप्प्याने अचूक लक्ष्यभेदी क्षमतेने कार्य करतात.
ओळख क्षमतेसाठी: EO/IR (Electro-Optical/Infrared), Radar आणि RF Sensor आधारित आधुनिक मल्टी-सेन्सर मॉड्युलर प्रणाली
शत्रू ड्रोनचा 2.5 किलोमीटरपर्यंत शोध व नष्ट करण्याची क्षमता
6 ते 10 किमी अंतरावरून हवाई धोक्यांचा अचूक शोध
5000 मीटर उंचीवर देखील सहज वापरयोग्य – पर्वतीय प्रदेशांसाठी योग्य

‘भार्गवास्त्र’च नाव का बरं?
‘भार्गवास्त्र’च्या नावामागे खास कारण आहे. महाभारतात काही विध्वंसक अस्त्र वापरले गेले होते. यापैकी एक भार्गवास्त्र देखील होते, ज्याचे नाव महर्षी भार्गव परशुराम यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. आता या नावापासून प्रेरणा घेऊन, भारताने एक अत्याधुनिक सूक्ष्म-क्षेपणास्त्र आधारित काउंटर-ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. भारताच्या ताफ्यात सामील झालेले हे नवीन ‘भार्गवास्त्र’ आधुनिक युद्धात देशाच्या सुरक्षेला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...