Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत नितीन गडकरींशी डॉ. भारती पवारांची चर्चा

जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत नितीन गडकरींशी डॉ. भारती पवारांची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे. यावेळी चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर (Dr. Rahul Aher) उपस्थित होते…

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील देवळा तालुक्यातील महत्वाचा असलेला एनएच ७५२ जी सटाणा-देवळा-मंगरूळ रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या भू संपादित होणाऱ्या जमिनीच्या अडचणीं संदर्भात व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी गडावर जाणारा नाशिक दिंडोरी वणी रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा व रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील वाहनधारक व स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग 848 हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरातला जाणाऱ्या रस्त्यावरील कोटंबी व सावळघाटासह अनेक कामे प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू नये.

तसेच टोल परिसरातील २० किलो मीटरच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देण्यामागची व नियमित शेतमाल ने- आण करणाऱ्‍या स्थानिक शेतकऱ्‍यांना टोलमध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली असून त्यासाठी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार करू, असे यावेळी सांगितले.

प्रस्तावित असलेला सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड रस्तासाठी जमिन भुसंपादन व शेतकऱ्यांना त्याबाबतचा योग्य मोबदला मिळण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सविस्तर चर्चा करून निवेदन दिल्याचे राज्यमंत्री डॉ.पवार यांनी सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नोटबंदी काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

- Advertisment -

ताज्या बातम्या