Thursday, May 15, 2025
Homeधुळेभाऊसाहेब हिरे मेडिकलला 17 लाख लिटर पाण्याची गरज

भाऊसाहेब हिरे मेडिकलला 17 लाख लिटर पाण्याची गरज

धुळे Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Bhausaheb Here Medical college) व सर्वोपचार रुग्णालयाला (Hospitals) किमान 17 लाख लिटर पाण्याची (17 lakh liters of water required) आवश्यकता आहे. ही गरज पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी (authorities) महापालिका आयुक्तांकडे (Municipal Commissioner)प्रस्ताव सादर केला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी बैठकीत प्रस्ताव सादर करण्याबाबत सुचित केले आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हनुमान टेकडी, चक्करबर्डी जलकुंभ येथून कमीत कमी 17 लाख लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे.

रुग्णालयात दररोज 1100 ते 1200 बाह्यरुग्ण (ओपीडी) असून 750 ते 850 आंतररुग्ण राहतात. तसेच येणार्‍या प्रत्येक रुग्णाबरोबर 2 ते 3 नातेवाईक असतात. महाविद्यालयाकडे पदवी, पदव्युत्तर 1200 विद्यार्थी, 350 नर्सेस, सर्व वस्तीगृह, सर्व वर्ग 1 ते 4 अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थान, सर्व शस्त्रक्रियागृह विभाग, अधिसेविका कार्यालय, परिचारीका वसतीगृह व बाह्यरुग्ण विभाग, न्यायवैद्यकशास्त्र विभाग (शवविच्छेदन विभाग) तसेच इतर विभाग आहेत.

या सर्वठिकाणी पाणी पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कमीत कमी 17 लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध व्हावा. वरील सर्व ठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, भविष्यात पाण्याचा तुटवडा होणार नाही, तसेच रुग्णसेवेत अडथळा येणार नाही.

सदर पत्राची प्रत आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आलेली आहे. अशी माहिती अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी दिलेली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...