Sunday, September 27, 2026
HomeनगरRahata : भावली ओव्हरफ्लो, दारणात 70 टक्के पाणी

Rahata : भावली ओव्हरफ्लो, दारणात 70 टक्के पाणी

गंगापूर 76 टक्के, नवीन पाण्याची आवक सुरूच || कुकडी प्रकल्पात पाणीसाठा 50 टक्के

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे आगमन अधूनमधून होत आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली तुडूंब भरले. या धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दारणा 70 टक्के, गंगापूर 76 टक्क्यांवर पोहचले आहे. दारणा समूहाच्या धरणांच्या पाणलोटात काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत इगतपुरी येथे 103 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 71, भावलीला 108 मिमी पावसाची नोंद झाली. भामला 65 मिमी पावसाची नोंद झाली. वाकीला 30 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात 171 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वाकी मध्ये 34 दलघफू, भावलीत 86 दलघफू, भाम मध्ये 96 दलघफू असे पाणी नव्याने दाखल झाले.

- Advertisement -

दारणा धरणाचा उपयुक्त साठा 66.14 टक्के इतका झाला. काल दिवसभरात तो 67 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. भावलीच्या पाणलोटातील मुसळधार पावसाने या धरणाचा साठा 100 टक्के झाला. या धरणाच्या सांडव्यावरुन काल पहाटे विसर्ग सुरू झाला. दारणा नदीच्या दिशेने 73 क्युसेकने सुरू झाला आहे. हे पाणी दारणा धरणाच्या दिशेने वाहत आहे. कडवा धरण 76.30 टक्के भरले आहे. मुकणे 33.65 टक्के भरले आहे. वालदेवी 75.20 टक्के भरले. कडवा 76.30 टक्के, आळंदी 34.30 टक्के भरले आहे.

गंगापूर च्या पाणलोटात आंबोली 51, त्र्यंबक 14, गंगापूर 21, कश्यपी 12, गौतमी गोदावरी 20 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर मध्ये 24 तासांत 74 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गंगापूरच्या भिंतीजवळ 15 मिमी पावसाची नोंद झाली. हे धरण 75.91 टक्के भरले. 12 तासात 88 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. कश्यपी 51.58 टक्के भरले. काल दिवसभरात 8 मिमी पावसाची नोंद झाली. 19 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गौतमी गोदावरी 88.15 टक्के भरले. काल दिवसभरात 14 मिमी पावसाची नोंद झाली. 12 तासात 25 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये काल अखेर 52.84 टक्के पाणी साठा झाला आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 78.76 टक्के इतका होता.

कुकडी प्रकल्पात पाणीसाठा 50 टक्के

घोडमध्ये 99.60 टक्के पाणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात आषाढ सरी कोसळत असल्याने दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प समूह धरणातील उपयुक्त पाणीसाठा 50 टक्क्यांवर गेला आहे. 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर पोहचला आहे. वडज धरणातील पाणीसाठा 86 टक्के आहे. मायनसमध्ये असलेल्या पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा 11 टक्क्यांवर गेला आहे. विसापूरही ओव्हरफ्लोच्या मागावर आहे. या धरणातील पाणीसाठा 91 टक्के आहे. घोड धरणही भरले असून या धरणातील पाणीसाठा 5959 दलघफू(99.60 टक्के) आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 656 दलघफू पाणी दाखल झाल्याने उपयुक्त पाणीसाठा 14047 (47.22 टक्के) झाला होता. काल दुपारी हा पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला आहे. गतवर्षी या काळात 53 टक्के पाणीसाठा झाला.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा...

0
चांदवड | प्रतिनिधी | Chandwad तालुक्यातील कुंदलगाव शिवारातून जाणाऱ्या मालेगाव-मनमाड मार्गावर (Malegaon-Manmad Highway) शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन...