घरातील वस्तू आपल्या जीवनावर, संपत्तीवर आणि सौख्यावर त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्त्वावर ही सखोल परिणाम पाडतात.
वास्तुशास्त्राची काही मूळ तत्त्वं जवळ जवळ सर्वांनाच माहिती असतात. जसं की दक्षिणेकडे मुख्य दार असू नये. उत्तरेकडील दिशेला तिजोरी ठेवू नये. घराला घाण साठवू नये वगैरे. पण वास्तूच्या काही टिप्स अश्या असतात की ज्या आपल्या व्यक्तित्वावर सखोल प्रभाव पाडतात.
जर आपण उदासीन असाल आणि आपल्याला असे वाटत असेल की आत्मविश्वासाच्या अभावामुळे आपल्याला आपले उद्दिष्टे साध्य करता येत नाही किंवा आपल्याला इतर लोकांसमोर आपले मत मांडताना संकोच होतो. तर आम्ही आपल्याला असे काही वास्तू उपाय सांगत आहोत जे आपल्यासाठी प्रभावी ठरतील.
पितळ्याच्या धातू पासून बनवलेला सिंह निव्वळ आपल्या घराचे सौंदर्यच वाढवीत नाही तर ते आपल्यामधील न्यूनगंडाची भावना आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेची भावनेला नाहीसं करतं.
वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते जर आपण या पितळी धातूपासून बनलेल्या सिंहाला घराच्या पूर्वेकडील दिशेला ठेवल्यावर हे आपल्यामध्ये आत्मविश्वासाची भर टाकतो.
एक लक्षात ठेवावे की जेव्हा आपण या सिंहाला आपल्या घरात स्थपित करता तेव्हा या सिंहाचे मुख घराच्या केंद्र स्थानी असावे.