Sunday, November 24, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

- Advertisement -

6 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, शुक्र, हर्षल या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रह चौकटीतील प्रमुख ग्रह शुक्र असल्यामुळे प्रेम भावनेचा तुमच्यावर प्रभाव राहील. सर्वांविषयी सहानुभूती वाटेल. उदार स्वभावामुळे सर्वांना हवेहवेसे वाटाल. प्रेमाशिवाय जीवन म्हणजे वाळवंट अशी मानसिकता आहे. सूर्याचा प्रभाव आदर्शवादाची ओढ लावेल. जेथे जाल तेथे मित्रांची संख्या वाढत जाईल. सामाजिक कार्याची आवड राहील. अचूक गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती सुधारतत जाऊन नंतर धनी लोकात गणना होईल. चित्रपट किंवा नाटकांद्वारे तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकेल.

7 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, रवि, हर्षल, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांच्या चौकटीतील नेपच्यून तुम्हाला अतिशय महत्त्वाकांक्षी बनवेल. आणि ती प्राप्त करण्याचा अलौकिक मार्गाने प्रयत्न कराल. इतरांवर हुकूमत करावीशी वाटत नसली तरी इतरांनी तुमच्या कामात ढवळाढवळ करू नये असेच वाटेल. स्वाभिमान जास्त असून त्याचे रक्षण करण्यासाठी कितीही नुकसान झाले तरी त्याची पर्वा नाही. सहकार्‍यांबद्दल फार प्रेम वाटेल. जगात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. हे लक्षात आल्यावर जीवनाचा मार्ग बदलेल. आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

8 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि,शनी, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. शनीच्या प्रभावामुळे जीवनात अनेक प्रकारचे विरोधाभास निर्माण होतील. स्वभाव उदार असून इतरांच्या अडचणींच्या वेळेला मदतीसाठी धावून जाल. पण नंतर मिळणारा प्रतिसाद फारच थंड असेल. इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे स्वभाव हट्टी आहे असे लोकांना वाटेल. अनेक विरोधक निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी असली तरी ती इतरांपेक्षा काही तरी वेगळ असेल. त्यामुळे तुमच्या कामात सहकारी म्हणून इतरांना सहभागी करून घेण जड जाईल. खरे तर भागीदार घेण तुमच्यासाठी चांगले आहे. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत सकर्त राहावे लागणार आहे.

9 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. मंगळाबरोबर रवि असल्यामुळे तुमच्या स्वभावात व शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त राहील. साहजिकच त्यातून उतावळेपणा व धडक देण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. त्यातून निर्माण होणारा दुसरा दोष म्हणजे स्पष्टवक्तेपणा. दुसर्‍यांचे दोष त्यांच्या तोंडावर सांगितल्यामुळे शत्रुसंख्या वाढेल. स्वतंत्र बाणा असल्यामुळे कोणाचा विरोध मुळीच सहन होणार नाही. दुसर्‍यावर झालेल्या अन्यायासाठी विकतचे श्राद्ध घेऊनच तुम्ही आंदोलनाचा नेता म्हणून पुढे रहाल. आयुष्याच्या पूर्वार्धात बर्‍याच आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल. 36 व्या वर्षानंतर आर्थिक स्थिती फार चांगली राहील.

10 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. विचारांची गती अधिक असल्यामुळे महत्त्वाकांक्षा ही त्याच प्रमाणात मोठी असणार ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी तुमच्याकडे असेल. नेहमी उद्योगात मग्न असणे तुम्हाला आवडेल. दिलेला शब्द पाळणे व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडणे ही दोन खास वैशिष्ट्ये आहेत. सरकारी, निम सरकारी , खाजगी कोणतेही क्षेत्र निवडले तरी तुम्ही उच्च पदावर आरूढ व्हाल यात शंका नाही. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. अडचणी व अडथळ्यांना पार करून श्रीमंत होणार यात शंका नाही.

11 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, सूर्य, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. बुद्धी अतिशय तीव्र आहे. त्यात सामाजिकतेची भर पडल्यामुळे दूधात साखर पडल्यासारखी आहे. अनेक लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे आत्मविश्वास दांडगा राहील. त्यामुळे अनेक क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने अनेक संधी प्राप्त होतील. कला, साहित्य, संगीत, नाटक यापैकी एखाद्या क्षेत्रात यश मिळेल. नावलौकीकही प्राप्त होईल.आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत भाग्यवान असले तरी पैशाच्या बाबतीत म्हणावे तसे आकर्षण रहाणार नाही. तरी तुमची अर्थप्राप्ती भरपूर असेल.

12 ऑगस्ट –

वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल,गुरू, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. इच्छाशक्ती प्रबळ असून महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. त्यामुळे साध्या यशाने तुमचे समाधान होणार नाही. समाजात महत्वाचे स्थान प्राप्त करणे हा तुमच्या महत्त्वाकांक्षेचा एक पैलू असेल. कोणतेही काम मनापासून व सर्व शक्ती पणाला लावून कराल. कधी कधी स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होईल. आर्थिक बाबतीत स्वतःचे निर्णय कार्यान्वित केल्यास हळूहळू आर्थिक स्थिती सुधारत जाईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या