Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधबाबा रामदेव : हस्तरेषांचे नेत्रदीपक यश

बाबा रामदेव : हस्तरेषांचे नेत्रदीपक यश

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

रामदेव बाबा यांचा जन्म 1965 साली सैय्यदपूर, जि.महेंद्रगढ, हरियाणा येथे झाला, त्यांच्या वडिलांचे नाव रामनिवास यादव ते गरीब शेतकरी होते. रामदेव बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ते अडीच वर्षाचे असतानाच त्यांना लखवा झाला होता, परंतु नियमित योगा करीत असल्याने ते त्यातून बरे झाले. मूळ प्राचीन भारतीय योगा व संस्कृत भाषा ते गुरुकुलच्या शाळेत शिकले. रामदेव बाबांना आर्य समाजाचे आचार्य बलदेव, गुरु करमवीर हे गुरु लाभले, त्यांनी पुढे दिक्षा घेऊन संन्यास व्रत स्वीकारले त्या वेळेस त्यांचे नामकरण स्वामी रामदेव करण्यात आले.

- Advertisement -

जिंद हरियाणा येथील कलवा गुरुकुल येथ गावकर्‍यांसाठी रामदेव बाबांनी योगाचे मोफत प्रशिक्षण चालू केले, पुढे ते हरिद्वार येथे गेले व त्यांनी कांगरी विश्वविद्यालय येथे स्वयं शिस्त व ध्यानधारणेचे सखोल शिक्षण घेतले व त्याचबरोबर मूळ भारतीय योगाचे अध्ययन बरेच वर्षे केले.

1990 च्या दरम्यान रामदेव यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती पिकत नसल्याने हरियाणा वरून बोलावून घेतले व ते हरिद्वार येथे स्थायिक झाले. रामदेव बाबा यांचे मुख्य योग केंद्र गंगेच्या काठी हरिद्वार येथे आहे, याठिकाणी त्यांनी दिव्य मंदिर ट्रस्टची स्थापना केली, 1995 च्या दरम्यान विविध दूरदर्शन वाहिन्यांवरून योग शिक्षणाचे प्रसारण होऊ लागले.

पुढे 2003 साली आस्था या दूरदर्शन वाहिनीवर योगाचे नियमित प्रसारण होऊ लागले. रामदेव बाबांनी योगाचे प्रशिक्षणाचे शिबिरे घेण्यास सुरवात केली त्याला देश विदेशी नागरिकांनी व नामांकित व्यक्तींनी प्रचंड प्रतिसाद दिला,

2006 साली कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये गरिबी या विषयावर भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. ओम शांती ओम या दूरदर्शन वरील कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले, 2014 साली स्वच्छ भारत मिशन च्या अतिथीगणात मा. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबांना आमंत्रित केले होते.

पतंजली आयुर्वेद ग्राहक उपयोगी वस्तू बनविणारी सध्याची अग्रणी कंपनी आहे, पतंजली आयुर्वेदाची स्थापना बाबा रामदेव व त्यांचे स्नेही बालकृष्ण यांनी 2006 साली केली. बालकृष्ण यांच्याकडे पतंजली आयुर्वेदाचे 95% शेयर आहेत तर पतंजलीच्या विविध वस्तूसाठी रामदेव बाबा यांच्याच नावाचा उल्लेख होतो, रामदेव हे पतंजली सर्वेसर्वा आहेत सर्व पतंजली कंपनीचे निर्णय हे रामदेव बाबाच घेतात.

पतंजली योगपीठाची स्थापना 2006 साली केली, त्याचे मुख्यालय हरिद्वार येथे आहे व त्यांच्या शाखा जगभरात आहेत, या योगपीठाचा मुख्य उद्देश योगा व आयुर्वेद संशोधन आहे. रामदेव बाबा यांनी भारत स्वाभिमान संस्था 2009 साली स्थापन केली.

रामदेव बाबांच्या उजव्या हाताचे हस्तसामुद्रिकदृष्ट्या भाग्याचे कारकत्व !

रामदेव बाबा यांचे वय सध्या 55 आहे योगा व आयुर्वेदिक जडी बुटींच्या ज्ञानाच्या आधारावर तरुणाला लाजवतील इतकी शारीरिक क्षमता त्याच्यात आहे. प्रयत्नांना नशीब कसे साथ देते त्याचे मूर्तिमंत उदाहरण रामदेव बाबांचे आहे, गरीब शेतकर्‍याच्या पोटी एका खेड्यात जन्माला आलेल्या रामदेव बाबांच कर्तृत्व खूपच महान आहे.

वाडवडिलांचे व त्यांच्या संपत्तीचे, मोठ्या नावाचे कुठलेही वलय नसताना त्यांची आज आंतरराष्ट्रीय ओळख आहे. खेड्यापाड्यात रामदेव बाबांचे स्वदेशी उत्पादन वाजवी दरात पोहचल्यामुळे जनसामन्यात त्यांची ओळख आहे. टी.व्ही.वरील जाहिरात असो अथवा योगाभ्यास असो ते कायम छोट्या पडद्यावर दिसतात.

रामदेव बाबांची आयुष्य रेषा व मस्तक रेषा वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत एकत्र आहे व ती फारशी आरोग्यकारक नाही, त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती ही किशोरावस्थेत कमीच असणार आहे.

मस्तक रेषा वयाच्या 40 वर्षापर्यंत सर्पाप्रमाणे वळणदार आहे यामुळे रामदेव बाबांच्या अस्थिर मनाची कल्पना येते, मात्र वय वर्ष 40 नंतर रवी ग्रहाकडे खेचली गेल्याने मान, सन्मान प्रसिद्धीचा खटाटोप त्यांचेकडून वय वर्ष 40 ते 50 पर्यंत शिगेला पोहोचला होता.

मस्तक रेषेचे तीन तुकडे आहेत पहिल्या उगम पावलेल्या मस्तक रेषेखाली एक तुकडा व तिसरा चंद्र उंचवट्यावर आहे. अश्या परिस्थितीत दोन ते तीन भिन्न क्षेत्रातील हुशारी असते व अश्या व्यक्ती सहजतेने भिन्न विषयावर प्रभुत्व प्रस्थापित करू शकतात याची प्रचिती योगा, आयुर्वेद या क्षेत्रातील त्यांच्या यशामुळे सिद्ध झाली आहे.

रवी रेषा व ग्रहसुद्धा प्रसिद्धीसाठी अनुकूल असल्याने त्यांनी प्रसिद्धीसाठी केलेल्या संघर्षाला नेत्रदीपक यश प्राप्त झाले.

हृदय रेषा बाकदार नाही ती बर्‍यापैकी सरळ गुरु ग्रहावर गेली आहे त्यामुळे आपल्याला पटेल ते करणे, वागणे व स्वतःचा स्वार्थ व व्यवहार यांना त्यांच्या भावनात्मक बाबींवर नेहमी मात करतो. गुरु ग्रहावर हृदय रेषा सरळ थांबल्याने यांची स्वतःची भावनात्मक बाजू कमजोर असते, मी सर्वांना प्रेम देतो पण तितके प्रेम मला मिळात नाही अशी त्यांची कायमची भावना असते.

हृदय रेषेचा एक तुकडा शनी ग्रहाच्या खाली गुरु ग्रहापर्यंत आहे, या आडव्या छोट्या हृदय रेषेच्या तुकड्यामुळे सहज होणार्‍या सर्व कामात नेहमी अडथळा येतो.

आयुष्य रेषेतून पहिली सर्वात मोठी उत्कर्ष रेषा वयाच्या पंचेचाळीस वर्षाला आहे. 2006 पासूनच बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आयुष्य रेषेतून भाग्य रेषेचा उगम आहे त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होत गेले. भाग्य रेषा मस्तक रेषेपर्यंत नागमोडी आहे व शनी क्षेत्राच्या बाहेर असल्याने आर्थिक स्थिती चांगली नाही, पुढे भाग्यरेषा उत्कृष्ट प्रतीची नाही त्यामुळे सांपत्तिक हव्यास दिसून येत नाही व आर्थिक संपन्नता नशिबातही वय वर्ष 50 पर्यंत नव्हती.

वयाच्या 25 व्या वर्षानंतर आयुष्य रेषेचा आंत मंगल रेषा वय वर्ष 65 पर्यंत उत्तम आहे त्यामुळे बाबांचा उत्साह व जोम वय वर्ष 65 पर्यंत कमी होणार नाही. मंगळ रेषेच्या शेजारी वय वर्ष 10 पासूनची प्रभाव रेषा आहे वडिलांच्या व गुरूंचा प्रभाव यांच्यावर असतो व तो जवळ जवळ जीवनभर आहे.

विवाह रेषा उशिराने बुध ग्रहावर आहे, परंतु सन्ंयासी राहण्याचे ठरवल्यामुळे विवाह हा विषय संपलेला आहे.

अंगठ्यावर पहिल्या पेरावर यव चिन्ह आहे सुखात कमी पडणार नाही आर्थिक चिंता कधीही भासणार नाही, तसेच रवी व गुरु ग्रहाच्या बोटांच्या दुसर्‍या पेर्‍यावर यव चिन्ह त्यामुळे रवी व गुरु ग्रह अत्यंत शुभ झाले आहेत.

मस्तक रेषा व हृदय रेषेच्या दरम्यान वरच्या मंगळ ग्रहावर आडवी शत्रू रेषा आहे त्यामुळे शत्रू पीडा कायमची आहे.

प्रसिद्धी मिळायला लागली कि त्यामागे पैसा हा येत असतो, मात्र रामदेव बाबांनी सांपत्तिक व आर्थिक मोह टाळला आहे व नशिबात सुद्धा तो नाही त्यांच्या नावावर आर्थिक व्यवहार नाहीत जमीन जुमला नाही तरीही त्यांनी निर्माण केलेल्या प्रचंड आर्थिक साम्राज्याचा उपभोग त्यांना मिळत राहणार आहे, नाहीतरी व्यक्ती जेंव्हा पंचतत्त्वात विलीन होते तेंव्हा तिला स्वतः बरोबर काहीही नेता येते का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या