सौ. वंदना अनिल दिवाणे – किरोच्या नजरेतून
12 ते 18 नोव्हेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
12 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, मंगळ, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. गुरू व मंगळ ग्रहाची युती अतिशय सामर्थ्य देणारी आहे. तिचा योग्य उपयोग केल्यास जीवनात उत्तम यश मिळून समाजात महत्व प्राप्त होईल. आत्मविश्वास दांडगा आहे. जबाबदारीचे कोणतेही काम चांगल्याप्रकारे पार पाडू शकाल. सुरूवातीच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यांना धैर्याने तोंड देऊन व पार करून आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी व्हाल यात शंका नाही. अनुभव दांडगा राहील. कोणत्याही करिअरमध्ये उत्तम धनप्राप्ती होईल.
13 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. हर्षल व मंगळ हे सूर्य मालिकेतील विध्वंसक ग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या एकत्रित येण्याने जीवन निश्चीतपणे हटके राहील. इतरांनी अवलंबिलेला मार्ग करिअरच्या दृष्टीने मुळीच आवडणार नाही. सुपीक बुद्धीमत्तेमुळे नवीन मार्ग शोधून त्यातून प्रचंड यश मिळवून समाजात धमाल उडवून द्याल. तुमचे अभ्यासाचे विषयही वेगळे असतील. दुसर्यावर अवलंबून न रहाता स्वतःच्या विचाराने तयार केलेल्या योजनातून चांगला पैसा मिळू शकेल.
14 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. बुधामुळे मंगळाचे सामर्थ्य बौद्धिक दृष्ट्या वाढलेले आहे. व्यवस्थापन कौशल्य भरपूर आहे. इतरांपेक्षा वेगळ्या वळणाने जाऊन व निरनिराळ्या क्लृप्त्या काढून विपुल प्रमाणात धनप्राप्ती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कलाक्षेत्राविषयी जरा जास्तच आपुलकी वाटते. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान आहात.
15 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. शुक्र आणि मंगळ यांचे एकत्र येणे ही एक भाग्यकारक घटना आहे. मात्र कधी कधी यामुळे प्रेमाच्या बाबतीत निराशा पदरात पडण्याची शक्यता आहे. नातेवाईक तुमच्याविषयी मत्सराची भावना बाळगतील. त्यागी व परोपकारी वृत्तीमुळे आई वडील, जवळचे लोक तुमच्यावर प्रेम करतील. जीवनात सुरुवातीला अनेक अडथळे येतील. त्यामुळे लक्ष्य प्राप्तीस विलंब होईल. मात्र एकदा गाडी रूळावर आली की धनप्राप्तीचा ओघ शेवटपर्यंत सातत्याने सुरू राहील.
16 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, मंगळ, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. व्यक्तीमत्वावर नेपच्यूनचा विशेष प्रभाव राहील. विशेषतः अंर्तमनसूचक स्वप्ने, साक्षात्कार, निरनिराळे भास यासारख्या सूचना अगोदरच मिळत राहतील. तुम्ही संपर्कात येणार्या लोकांबद्दल व भोवतालच्या वातावरणाबद्दल संवेदनशील रहाल. धनप्राप्तीकडे लक्ष दिल्यास प्रचंड प्रमाणात पैसा मिळेल. मात्र मार्ग अलौकीक व इतरांना लक्षात न येणारे असतील.
17 नोव्हेेंबर-
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. एकमेकांचे शत्रु असलेल्या मंगळ व शनी ग्रहाचे एकत्रिकरण तुमच्यापुढे अनेक अडचणी व संकटे निर्माण करण्याची शक्यता आहे. शनी न्यायाधीश असल्याने अवैध मार्गाला गेल्यास शिक्षा करेल. मात्र संकटातून निभावून जाण्याची शक्ती मंगळ देईल. आयुष्याच्या पूर्वार्धात क्रांतीसाठी बराच संघर्ष करावा लागेल. स्वतःचा निर्णय दुसर्यावर लादण्याची सवय राहील. एकतर खूप श्रीमंत व्हाल किंवा भयानक अडचणीत सापडाल. मधला मार्ग नाही.
18 नोव्हेेंबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाच्या प्रभावामुळे लष्कर व पोलीस खात्यात काम करणे प्रगतीचे राहील. तसे न झाल्यास तुम्ही कोणत्याही करिअरमध्ये आपली लष्करी वृत्ती दाखविल्याशिवाय रहाणार नाही. राजकारणात उत्तम नेता म्हणून चांगले यश मिळेल. सुरूवातीच्या संघर्षानंतर तुम्हाला आर्थिक बाबतीतत चांगले यश मिळेल. त्यानंतर पीछेहाट कधीच होणार नाही.