सौ वंदना अनिल दिवाणे
1 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य,हर्षल, शुक्र, शनीग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुम्हाला समाजाचा उद्योगाचा अथवा व्यापाराचा नेता म्हणजे प्रमुख बनविले जाईल. जेथे जाल तेथे महत्त्व प्राप्त होईल. जीवनस्तराची वृद्धी करतांना बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीत तडजोड करून मानसिक शांती मिळविण्याचा प्रयत्न कराल. रूळलेल्या रस्त्यावरून न जाता आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर वेगळे मार्ग काढून भरपूर पैसा मिळविण्यात यश मिळेल यात शंका नाही.
2 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. तुमची प्रगती रूळलेल्या मार्गाने न जाता जन्मतः प्राप्त दैवी सामर्थ्य अथवा प्रतिभेच्या जोरावर होईल. योजनेचा परिपाठ किंवा शेवट सोपा जाईल. स्वतः घेतलेल्या निर्णयामधून चांगले यश मिळेल. विशेषतः पैशाच्या बाबतीत. दुसर्याचा सल्ला घेणे महागात पडेल. स्वनिर्णयाने धनी व्हाल.
3 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. तुमच्यावर गुरूचा प्रभाव अधिक असल्याने इच्छाशक्ती आणि निश्चयात्मक बुद्धी प्रबळ राहील. कोणतेही करिअर असो तुमच्या ग्रहांची चौकट इतकी मजबूत आहे की, त्यात यश स्वतःहून शोधता येईल. आपल्या बरोबरीच्या लोकांपेक्षा बराच वरचा दर्जा प्राप्त कराल. प्रत्येक काम मनापासून केल्यामुळे उत्तम मानसिक समाधान लाभेल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ चांगली लाभेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही श्रीमंत व्हाल.
4 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य,शनि व शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. हर्षल आणि शनिच्या प्रभावामुळे तुमचे जीवन इतरांपेक्षा वेगळे राहील. त्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक विचित्र अनुभव येतील. आपण नियतीच्या हातातील बाहुले आहोत. त्यामुळे आपल्या जीवनाचे सुकाणू आपल्या हाती नाही असे तुम्हला सारखे वाटेल. यालाच दैववाद म्हणतात. सुरूवातीच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत अडथळे पार करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल. उत्तरार्धात मात्र सुस्थिती प्राप्त होईल.
5 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शनि,सूर्य, शुक्र्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुध, शुक्र आणि शनी ग्रहाचे एकत्र येणे व्यक्तीमत्वाला फार पोषक आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तीत्वात विशेष सामर्थ्य निर्माण झाले आहे. कुटुंबातील मंडळी आणि नातेवाईक यांच्यासाठी वाटेल तो त्याग करण्यात तुम्ही सदैव तयार असता. कधी कधी तर प्रगतीत आर्थिक अडचणी निर्माण होण्याच शक्यता आहे. आपणाजवळ इतरांपेक्षा अधिक बुद्धीमत्ता असल्याची जाणीव असल्याने आर्थिक अडचणी. उत्तरार्धात आर्थिक सुस्थिती.
6 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. व्यक्तीमत्वावार शुक्राचा प्रभाव असल्यामुळे मित्रांची संख्या फार मोठी राहील. मित्रांमध्ये तुम्ही फार लोकप्रिय असाल. तुमच्यामध्ये असलेल्या संमोहन शक्तीमुळे स्त्री वर्ग तुमच्याकडे आकर्षित होईल. सामाजिक संबंधात खर्चाचे प्रमाण अधिक राहील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कायम चांगली आहे. असे लोकांना वाटत राहील. स्वतःचे निर्णय कार्यान्वित केल्यास सहकार्याच्या मदतीने उत्तम धनप्राप्ती होईल.
7 ऑक्टोबर –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता समतोल राखण्याची कला अवगत केल्यास असामान्य बुद्धीमुळे आपली महत्त्वाकांक्षा सहज पुर्ण करू शकाल. काव्य, साहित्य, संगीत किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही कलेमध्ये उत्तम यश मिळेल. स्वभाव अत्यंत संवेदनशील आहे. साहसी स्वभावाला मात्र थोडा अंकुश लावा. कधी एमदम श्रीमंत तर कधी साधारण अशी आर्थिक परिस्थिती राहील.