किरोच्या नजरेतून
सौ. वंदना अनिल दिवाणे
15 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनीग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. शुक्राच्या प्रभावामुळे चांगली लोकप्रियता मिळेल. मित्रांची संख्या जास्त राहील. व्यक्तीमत्वामध्ये संमोहन शक्ती राहील. अनेक प्रेमप्रकरणे किंवा बहुविवाहाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा व सन्मान प्राप्त होईल. आर्थिक स्थितीचा आलेख चढता असेल.
16 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीव्र आहे. मिळालेल्या यशाची हवा डोक्यात शिरू न देता मनाचा समतोल राखू शकलात तर जीवनात उत्तम प्रगती होईल. कल्पनाशक्ती चांगली राहील. काव्य, चित्रकला, यासारख्या विषयांत प्रचंड यश मिळेल. आर्थिकस्थिती चढउताराची राहील. कधी श्रीमंत तर कधी सामान्य स्थिती अस चक्र सारखे चालू राहील.
17 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. वारसा हक्काने संपत्ती मिळाल्यास जास्त शारीरिक श्रम पडणार नाही. जीवन सुखाचे राहील. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. सामान्य व्यक्ती ज्या विषयाचा अभ्यास करणे टाळतात त्याचा सखोल अभ्यास करून त्यापासून मोठा नावलौकिक प्राप्त होईल. डॉक्टर, वैज्ञानिक, राजकारण यात उत्तम यश मिळेल. वारसाहक्काने संपत्ती मिळाल्यास आर्थिक स्थिती उत्तम अन्यथा आय व व्यय याचा मेळ बसविण्यात ओढाताण होईल.
18 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि, शुक्र्र, सूर्य, हर्शल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. उतावळ्या स्वभावामुळे अनेक भांडणे निर्माण होतील. त्यामुळे शत्रुंची संख्या मोठी राहील. वकील किंवा राजकारणी म्हणून या स्वभावामुळे चांगले यश मिळू शकते. पण तेथेही कलहाच्या अतिरेकामुळे शत्रुकडून प्रगतीत अडथळे येतील. साधारणपणे आर्थिक बाबतीत चांगले यश मिळू शकेल.
19 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्शल, सूर्य, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. हर्शल व शनी यांच्या एकत्रित प्रभावामुळे बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण झालेली आहे. शिवाय त्यामुळे ज्ञानग्रहण शक्तीचा वेगही वाढलेला आहे. विचारवंत आहात आणि निसर्गाचे वेड आहे. आहे. उद्योगशील असल्यामुळे कोणत्याही व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम यश मिळेल. भाग्यवान आहात. सर्वांचा विश्वास सहज संपादन केल्याने आर्थिक यश उत्तम राहील.
20 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी, चंद्र, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे स्वप्नाद्वारे किंवा अन्य मार्गाने पुढील सूचना मिळत राहील. त्याचा उपयोग तुमच्या योजनात केल्यामुळे उत्तम यश मिळेल. दुसर्यांनी केलेली टीका तुमच मन संवेदनशील असल्यामुळे लवकर झोंबेल. पण भविष्याचा विचार करून कणखर मनाने आपले कार्य चालू ठेवाल. व्यापार अथवा रूळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःच्या विशिष्ट गुणांचा वापर करून उत्तम आर्थिक यश मिळेल..
21 ऑक्टोबर -वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी, गुरू ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. गुरूच्या प्रभावामुळे तुमच्या सामर्थ्यवान व्यक्तीमत्वाद्वारे तसेच महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धीचा उपयोग तुम्हाला यशप्राप्तीसाठी होईल. महत्त्वाकांक्षा मोठी असल्यामुळे सामान्य पदाकडे तुम्ही ढुंकूनही पहाणार नाही. बरोबरीच्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त पुढे जाल. व्यापार, फायनान्स व इंडस्ट्रीपासून उत्तम यश मिळेल. त्यासाठी मोठ्या लोकांची मदत मिळेल.