प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ किंवा पावित्र्य नदीच्या काठी दीपदान करण्याचे महत्त्व आहे. आणि दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे.कोणते ही शुभ कार्य असो, मग ते सांस्कृतिक उत्सव असो, किंवा सण असो, सर्व शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते.
धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे. अशी आख्यायिका आहे की अग्निदेवांना साक्ष मानून केलेले प्रत्येक कार्य यशस्वी होतात. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश आणि ज्ञानाच्या स्वरूपात मदेवफ सर्वत्र व्यापतो. ज्ञान प्राप्तीमुळे अज्ञान रुपी मानसिक विकार दूर होतात. जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. म्हणून प्रकाशाच्या उपासनेला देवाची उपासना मानले गेले आहे.
पौर्णिमेला दीपदान – अग्निपुराणानुसार जो मनुष्य देऊळात किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान एक वर्ष पर्यंत दीपदान करतो त्याला सर्व काही मिळतं. याच प्रकारे चातुर्मासात, किंवा अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळात किंवा नदीकाठी दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो. असे मानले जाते की जो पर्यंत दिवा जळत असतो तो पर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतात. म्हणून तिथे मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते.
दिवा आपल्याला जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोख मिटविण्यासाठी प्रेरित करतो. या व्यतिरिक्त दीप प्रज्वलन केल्याने सर्व पाप नाहीसे होऊन जीवनात सौख्य भरभराट, आयुष्य, आरोग्य, आणि सुख आनंद वाढतंच जातं.
गायीच्या तुपाचा दिवा लावल्यानं सभोवतालीच वातावरण शुद्ध आणि जंतूमुक्त होत. रोगराई नाहीशी होते. पूजा उपासना करताना देखील दिवा लावण्यामागे हाच हेतू असतो की देव आपल्या मनातील अज्ञान रुपी काळोखाला दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करो.
सकारात्मक ऊर्जा देतो दिवा – कोणत्याही पूजा किंवा सणासुदीला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. कुटुंबातील सदस्यांना कीर्ती मिळते. वास्तूच्या नियमानुसार अखंड दिवा पूजेच्या आग्नेय कोणात ठेवावं. या दिशेमध्ये दिवा ठेवल्यानं शत्रूंवर विजय मिळते. आणि घरात सौख्य समृद्धी भरभराट चे वास्तव्य होते.
दिव्याच्या ज्योत संदर्भात असे मानले जाते की उत्तर दिशेत ज्योत ठेवल्यानं आरोग्य आणि आनंद वाढतो, पूर्वदिशेला ज्योत ठेवल्यानं दीर्घायुष्य मिळतं. लक्षात ठेवा की जर का दिवा चिकणमातीचा असल्यास दिवा स्वच्छ आणि संपूर्ण असावा. कोणत्याही पूजेत खंडित किंवा भंगलेला दिवा लावणं अशुभ आणि निषिद्ध मानले गेले आहे.
दिवा लावण्याच्या बद्दल असे म्हणतात की सम संख्येत दिवे लावल्यानं ऊर्जेचे संवहन निष्क्रिय होतात, तर विषम संख्येत दिवे लावल्यानं वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्मित होते. याच कारणामुळे धार्मिक कार्यात नेहमी विषम संख्येत दिवे तेवतात.