सौ. वंदना अनिल दिवाणे
नोव्हेंबर – 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि , द्वितीयात नेपच्यून, तृतीयात मंगळ, चतुर्थात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात नवमात शुक्र,दशमात रवि-बुध, लाभात केतू व्ययात गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे भो,जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी अशी आहेत. राशीचे चिन्ह मगर आहे. राशी स्वामी- शनि, तत्व – पृथ्वी असल्याने सहनशीलता चांगली. चर रास असल्याने सतत काही तरी बदल हवा असे वाटते. स्वभाव सौम्य, तमोगुणी, वात प्रकृती. स्थूलपणा टाळण्यासाठी दररोज हलका व्यायाम नियमीत करावा.
राशीचा अंमल गुडघ्यावर आहे. त्यासाठी गुडघ्याला इजा होणार नाही ही काळजी घ्यावी. शुभ रत्न निलम, शुभ रंग निळा, आकाशी व लाल, शुभ दिवस – शनिवार, देवता- शनि, शुभ अंक- 8, शुभ तारीख- 8,17,26. मित्र राशी- कुंभ, शत्रु राशी- सिंह. उत्तम प्रशासक, कर्तव्यदक्ष, सतत कामात मग्न,
दशमस्थानातील रविमुळे खात्रीने महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना यांची जास्त प्रचिती येईल. निवडणूकीच्या संदर्भात कार्यकर्ता अथवा पुढारी विशेष प्रचारकार्य करण्यात चांगले यश मिळेल. साधारणपणे असे समजले जाते की, अलीकडच्या काळात पितापुत्राचे म्हणावे तसे पटणार नाही. पण पितृसुख उत्तम मिळेल.
स्त्रियांसाठी -व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30
डिसेंबर- 2020
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनि, द्वितीयात नेपच्यून, तृतीयात मंगळ, चतुर्थात हर्शल, पंचमात राह, षष्ठात, नवमात शुक्र, लाभात केतू, व्ययाम गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.
तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली राहील. त्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. त्यात दैवी कृपेचाही भाग असेल. भावंडांसाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील. दैवी कृपेची प्रचिती येईल.
दशमात बुध आहे. उद्योग व्यवसायाचे स्थान. बुध बुद्धीचा कारक. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात उत्तम यश मिळेल. वक्तृत्त्वाला बहर येईल.
प्रतिभेच्या परीसस्पर्शातून पुनित झालेले लेखन लेखकाच्या लेखणीतून उतरेल. सज्जनांचे संगत लाभेल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. ही आवक सन्मार्गाने असल्यामुळे तणाव रहीत स्थिती राहील.
लग्नी शनि आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासू वृत्ती राहील. उद्योगशीलतेते वृद्धी होईल. हिशोबीपणामुळे धनसंग्रह करणे तर जमेलच शिवाय नियमीत बचत करणे सोपे जाईल. प्रामाणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भावनिकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमताचा अति हट्ट धरू नये.
स्त्रियांसाठी – महिलांच्या हातात पैसा खेळत राहील. पतीराज खूश राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी हेवा करतील. सुशिक्षीत महिला विद्येच्या बळावर धनप्राप्ती करतील.
विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल.शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30
जानेवारी- 2021
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध-गुरू- शनि, द्वितीयात नेपच्यून ,चतुर्थात मंगळ-हर्षल,पंचमात राहू,लाभात केतू व्ययात रवि – शुक्र-शनि अशी ग्रहस्थिती आहे.
लग्नी गुरू आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तीमत्व प्रभावशाली होईल. संसारात फार चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड वाटेल. शरीरप्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल.
कायद्याबाहेर जाणे परवडणार नाही. वाढत्या वयात शरीर स्थूल होण्याची भिती असल्याने चालण्याचा व्यायाम नियमीत करावा. वरिष्ठाच्या कृपेने उच्चपदप्राप्ती होईल. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. सरळ स्वभाव राहील. न्यायी व समतोल स्वभावामुळे लोकप्रियता वाढेल. समाधानी वृत्ती राहील.
एकादशात केतू आहे. पराक्रमाकडे कल राहील. बहुजन समाजाविषयी प्रेम वाटेल. सत्कर्मे कराल. मान्यता प्राप्त होईल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.
धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन संकल्पनांचे भांडार तुमच्यापुढे उघडे करेल. अन्य जनांचे लक्षही जाणार नाही अशा संकल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्यास द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे.
स्त्रियांसाठी -द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्या महिलांसाठी त्रासदायक आहे.
विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30