Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - तुला Quarterly Future - Libra

त्रैमासिक भविष्य – तुला Quarterly Future – Libra

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर- 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी बुध, द्वितीयात केतू, तृतीयात गुरु- प्लूटो , चतुर्थात शनि, पंचमात नेपच्यून, षष्ठात मंगळ, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू, लाभाम शुक्र, व्ययात रवि अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे रा, री,रू,रे,रो, ता,ती,तू,ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी शुक, तत्त्व वायू, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, त्यामुळे काही स्त्रियांची वागणूक पुरूषी थाटाची. रजोगुणी, स्वभाव- क्रूर, प्रकृती- कफ-वात-पित्त. राशीचा अंमल मांड्यांवर आहे. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग- पांढरा, शुभ दिवस- शुक्रवार, देवता- लक्ष्मी, शुभ अंक- 6, शुभ तारखा- 6,15,24. मित्र राशी -मिथून,मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रु राशी- सिंह. संशोधन कार्याची आवड, आत्मविश्वास दांडगा, वाणी आकर्षक व प्रभावशाली, नकारात्मक गुणईर्षा, घमेंड, अतिधूर्तता, विनोदी वृत्ती,

षष्ठात मंगळ आहे. शत्रूंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटन घडतील. कुटुंबात निष्कपटपणे वागल्यामुळे घरात कौटुंविक वातावरण शांत राहील. पंडितजणांशी मैत्री होईल. वेळोवेळी त्यांच्यापासून उत्तम मार्गदर्शन मिळेल.

स्त्रियांसाठी – हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी तुमचा हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसा उपलब्ध होईल. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31

नोव्हेंबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध, द्वितीयात केतू, तृतीयात गुरू-प्लुटो , चतुर्थात शनि, पंचमात नेपच्यून, षष्ठात मंगळ, सप्तमात हर्शल, अष्टमात राहू, नवमात, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखदायक घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. विद्याव्यासंगात भर पडेल. मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. अडी अडचणींच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा राहील.

तृतीयस्थानी गुरू आहे. यास्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमशील असतो. मात्र अपेक्षेपेक्षा सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कृपणपणा करण्याकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. बांधवाकडून म्हणावे असे सूख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. राजकीय कार्यकर्ते नेत्याना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखविताही त्यांची वृत्ती भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

लग्नी रवि आहे. स्वभाव उदार राहील. थोडा फार लोभी राहील. बुद्धी तीव्र असेल. पित्ताचा त्रास्र होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घेतली तर गंभीर आजार होणार नाही.

स्त्रियांसाठी – चतुर्थस्थानी शनि असल्यामुळे महिलांसाठी विशेष चांगला नाही. स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नात वाढ करावी म्हणजे खर्चास कठीण जाणार नाही. वाढत्या महागाईमुळे घरातील खर्चाचे बजेट सांभाळणे कठीण जाईल.

विद्यार्थ्यांसाठी – माता, पिता, गुरू यांच्या उपदेशांना लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात उत्तम प्रगती होईल.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

डिसेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि- बुध, द्वितीयात केतू, तृतीयात गुरू- प्लूटो, चतुर्थात शनि ,पंचमात नेपच्यून, षष्ठात मंगळ, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थानी केतू आहे. याठिकाणी केतू असता आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा मुळव्याध, मूत्राशय, पोटात गुबार धरणे, रक्तदाब वाढणे यासारखे आजार उद्भवतील. कर्जापासून शक्यतो दूर रहावे. तसे कर्ज घ्यावयाचे झाल्यास हप्ते वेळेवर भरण्याची जागरूकतेने काळजी घ्यावी. इस्टेटीसंबंधी काही भानगड होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांशी असत्य बोलून विरोध दाखविल्यामुळे पटणे कठीण होईल. एवढेच नव्हे तर सारे जग आपल्या विरोधात आहे असा बुद्धीभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. याठिकाणी केतू असता व्यक्तीमत्वात वृद्धी होते. चाल चलन शुद्ध ठेवल्यास सुख मिळेल.

सप्तमात हर्षल आहे. विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारिक अनुभव देईल. अन्य जणांना पत्नीसंबंधी काही विवंचना निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्यावी. मुळात विवाह उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाह संबंध ठरला असे वाटावे व ऐनवेळी विवाह दुसर्‍यासोबत व्हावा असाही काही विवाहोत्सुकांना अनुभव येईल. स्त्रियांसाठी -द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमातील नेपच्यून विद्यार्थ्यांना अंतःस्फूर्ती प्रदान करील.. पाठांतरासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. सतत वाचन केल्यास कोणताही विषय अवघड नाही. याची प्रचिती येईल.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या