सौ. वंदना अनिल दिवाणे
ऑक्टोबर- 2020 –
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, द्वितीयात बुध, तृतीयात केतू, चतुर्थात गुरु- प्लूटो, पंचमात शनिे, षष्ठात नेपच्यून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल, नवमात राहू, व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे टो, पा,पी, पु, घा, ना, टो, पे, पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री अशी आहे. राशी स्वामी बुध, राशी तत्त्व पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील. द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. त्वरित निर्णय घेतला तरी कृतीस उशीर लागेल. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री आहे. स्वभाव सौम्य, लाजाळू,धीटही. पण उद्धटपणा नाही. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटाच्या विकाराशी विशेष काळजी घ्या. शुभ रंग- हिरवा, शुभ रत्न – पाचू, शुभ दिवस- बुधवार, रविवार. शुभ अंक- 5, शुभ तारीख- 5,14,23. मित्र राशी- तुला. शत्रु राशी- कर्क. गणरायाची उपासना फायद्याची आहे.
तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्या उमेदवाराला याची प्रचिती येईल. कामाच्या घाईगर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. थोडा लोभी असेल. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्या महिलांसाठी त्रासदायक आहे.
विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखाच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवावी. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्र्रकृतीची काळजी घ्या.शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31
नोव्हेंबर – 2020 –
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात रवि-बुध, तृतीयात केतू, चतुर्थात गुरू-प्लुटो, पंचमात शनि, षष्ठात नेपच्यून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्शल, नवमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.
सप्तमात मंगळ आहे. कौटुंबिक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहीतांनी प्रेमविवाहाच्या भानगडीत पडू नये. फसगत होण्याची शक्यता आहे. विवाहीतांनी घरातील कलह घरातच मिटवावे. व्यापार्यांनी सौदे पुढे ढकलावे.
द्वितीय स्थानी बुध आहे. धनस्थानातील बुध सांपत्तिक भरभराट प्राप्त करून देणारा आहे. कमिशन बेसिसवर चालणारे व्यवसाय, लेखन, प्रकाशन यापासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रहास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. पण सध्याच्या काळातील बचत संस्थातील अनिश्चीतता पाहून योग्य व सुरक्षित बँका अथवा तत्सम वित्तसंस्थातूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वकलेमध्ये उत्तम प्रगती करू शकाल. राजकारणात असलेल्यांना याचा विशेष फायदा होईल. व्यापारी वर्गालाही हा महिना उलाढालीच्या दृष्टीने चांगला जाईल. धनप्राप्ती स्वपराक्रमानेच कराल. कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. प्रवासात सामान व पैसे सांभाळा. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नये.
स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्या अर्थाने उपभोग घ्याल.
विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्तीमुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. धाडसी प्रकारचे खेळात भाग घ्याल.शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30
डिसेंबर- 2020 –
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात रवि- बुध, तृतीयात – केतू, चतुर्थात गुरू- प्लूटो, ,पंचमात शनि, षष्ठात नेपच्यून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल, नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात गुरु आहे. गुरुमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे अडचणीत पराभव होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. सांपत्तिक आवक सुरळीत चालु राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. भपक्याची हौस वाटेल. पोकळ डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकांत हसे होईल. परदेशमगन करून भाग्य आजमावे.
पंचमात शनि आहे. शरीरप्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळवाल. स्थावरासंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारण, व्ही.आय.पी. लोकांशी संबंध यात चांगले यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश लाभेल. व्यापार्यांना लाभ होतील. तृतीयस्थानी केतू असता भावा बहीणीचे संबंध चांगले राहात नाही. भावंडामध्ये आपसात कलह उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मातेशीही पटणे अशक्य. धनसंग्रहात वाद होतो. दानशूर वृत्ती असेल. भाग्यवृद्धी होईल. आळसाला थारा देऊ नये. वादविवादाची हौस वाटेल. शांतता राखावी.
स्त्रियांसाठी -धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30